परशुराम घाटात अज्ञात इसमाचा मृतदेह, अपघात की घातपात अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 18:12 IST2022-06-09T18:11:38+5:302022-06-09T18:12:27+5:30

साधारण एक महिन्यापूर्वी त्या इसमाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथिमक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Unknown body in Parashuram Ghat, accident or massacre is still unclear | परशुराम घाटात अज्ञात इसमाचा मृतदेह, अपघात की घातपात अद्याप अस्पष्ट

परशुराम घाटात अज्ञात इसमाचा मृतदेह, अपघात की घातपात अद्याप अस्पष्ट

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. लचके तोडलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पेटविण्याचे मोठे आव्हान आता खेड पोलिसांसमोर आहे. साधारण एक महिन्यापूर्वी त्या इसमाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथिमक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

परशुराम घाटात रस्त्याच्या कडेला हा मृतदेह आढळला. खेड पोलिसांना याबाबत खबर मिळताच खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी काशीद, खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. ओळख पटेल असा कोणताच पुरावा मृतदेहाजवळ न आढळल्याने हा मृतदेह नेमका कुणाचा, त्यांचा मृत्यू अपघाती, की घातपाती याबाबत काहीच खुलासा होऊ शकला नाही.

या व्यक्तीचा मृत्यू सुमारे महिनाभरापूर्वी झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. भटक्या श्वापदांनी मृतदेहाचे लचके तोडले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. खेड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Unknown body in Parashuram Ghat, accident or massacre is still unclear