Ratnagiri: मूल होत नसल्याने विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:56 IST2025-12-30T16:55:37+5:302025-12-30T16:56:34+5:30
चिपळूण (जि. रत्नागिरी ) : उंदीर मारण्याचे औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आकले येथे गुरुवारी ...

Ratnagiri: मूल होत नसल्याने विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
चिपळूण (जि.रत्नागिरी) : उंदीर मारण्याचे औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील आकले येथे गुरुवारी घडली. जयश्री विजय मोहिते (वय २७, रा.आकले) असे या विवाहितेचे नाव आहे. मूल होत नसल्याच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय मोहिते व जयश्री यांचा २०१७ रोजी विवाह झाला होता. जयश्री यांना मूल होत नसल्याने त्या नेहमी तणावात असायच्या. त्या तणावात त्यांनी २४ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उंदीर मारण्याचे औषध घेतले होते. त्यांना उपचारासाठी दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेण्यात आले होते. तेथून अधिक उपचारासाठी त्यांना डेरवण रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना २५ रोजी सकाळी ९:४६ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.