शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

मदरशात राहून शिक्षण घेणाऱ्या उजमाने नीट परीक्षेत मिळवली विशेष गुणवत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 18:15 IST

Neet, educationsector, madrasha, ratnagiri, exam, शिक्षणाची ओढ असली की ती कसंही घेता येतं. कडवईच्या उजमाने हाच आदर्श दिला. मदरशामध्ये राहून धार्मिक शिक्षण घेतानाच तिनं वैद्यकीय शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहिली आणि ते फक्त स्वप्न न ठेवता सत्यात आणण्यासाठीचा प्रवासही सुरू केला. त्यासाठी नीट परीक्षेत विशेष गुणवत्ता मिळवून तिनं या स्वप्नांच्या प्रवासाचा पहिला टप्पाही गाठला.

ठळक मुद्देमदरशात राहून शिक्षण घेणाऱ्या उजमाने नीट परीक्षेत मिळवली विशेष गुणवत्ताप्रसुती तज्ज्ञ डॉक्टर होण्याचे ध्येय

मेहरुन नाकाडेरत्नागिरी : शिक्षणाची ओढ असली की ती कसंही घेता येतं. कडवईच्या उजमाने हाच आदर्श दिला. मदरशामध्ये राहून धार्मिक शिक्षण घेतानाच तिनं वैद्यकीय शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहिली आणि ते फक्त स्वप्न न ठेवता सत्यात आणण्यासाठीचा प्रवासही सुरू केला. त्यासाठी नीट परीक्षेत विशेष गुणवत्ता मिळवून तिनं या स्वप्नांच्या प्रवासाचा पहिला टप्पाही गाठला.धार्मिक शिक्षण घेतानाच शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा मनोदय कडवई (ता. संगमेश्वर) येथील उजमा नुरी या विद्यार्थिनीने पालकांकडे व्यक्त केला. तिने दहावी, बारावी पूर्ण करुन नीटची परीक्षा दिली. नीट परीक्षेत ७२० पैकी ६०१ (९८.०६ टक्के) गुण मिळवले. कष्ट, चिकाटी व जिद्दीच्या जोरावर उजमाने हे यश मिळवले आहे.कडवई येथील मदरशामध्ये उजमाचे वडील महमद तैय्यब खान व आई मैमुना विद्यार्थ्यांना अध्यापन करतात. उजमा व तिची अन्य दोन भावंडेही याच मदरशात शिक्षण घेतात. उजमाची धार्मिक शिक्षणातील प्रगती चांगली होती. त्यामुळे एकाचवेळी दहावी व धार्मिक शिक्षणातील ह्यआलिमाह्णची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिने दहावीत ७९ तर आलिमा परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले.दहावी परीक्षेत चांगले गुण प्राप्त झाल्याने तिने पुढील शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर माखजन येथील अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीला तिने ७४ टक्के गुण मिळवले. बारावी परीक्षेची तयारी करत असतानाच ह्यनीटह्णची परीक्षा दिली. उजमा या परीक्षेत उत्तीर्ण तर झाली मात्र पुरेशी गुणवत्ता नसल्याने तिला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी खासगी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला असता. आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य नसल्याने तिने पुन्हा नीट परीक्षा देण्याचे निश्चित केले.नीट परीक्षेसाठी उजमाने कोणताही क्लास लावला नव्हता. मात्र, इंटरनेट व ह्ययू ट्यूबह्णच्या माध्यमातून अभ्यासावर भर दिला. दररोज १४ ते १५ तास अभ्यास वर्षभर केला. त्याचे फळ तिला मिळाले असून, तिने नीट परीक्षेमध्ये ९८.०६ टक्के गुण मिळवले आहेत. एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी तिला आता सहज शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल, हे नक्की!प्रसुती तज्ज्ञचे ध्येयमुस्लिम समाजात प्रसुती तज्ज्ञ डॉक्टरांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे प्रसुती तज्ज्ञ होण्याचे उजमाचे ध्येय आहे. समाजातील गोरगरीब महिलांचे आजार व त्यावरील उपचार यासाठी काम करण्याची मनिषा असल्याचे उजमाने सांगितले. आई-वडिलांचे पाठबळ व आशिर्वाद यामुळेच यश संपादन केले असल्याचे सांगितले.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालMuslimमुस्लीमRatnagiriरत्नागिरीMedicalवैद्यकीयexamपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्र