राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना जनतेसोबतच - उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 17:52 IST2017-11-15T16:08:29+5:302017-11-15T17:52:42+5:30
शिवसेनेची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. त्यात कोणताही गोंधळ नाही. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सर्वात प्रथम आम्ही जनतेसोबत आहोत. त्यामुळे जनतेला रिफायनरी प्रकल्प नको असेल, तरी आम्ही जनतेसोबतच राहू आणि या प्रकल्पाला विरोध करू, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना जनतेसोबतच - उद्धव ठाकरे
राजापूर : शिवसेनेची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे. त्यात कोणताही गोंधळ नाही. आम्ही सरकारमध्ये असलो तरी सर्वात प्रथम आम्ही जनतेसोबत आहोत. त्यामुळे जनतेला रिफायनरी प्रकल्प नको असेल, तरी आम्ही जनतेसोबतच राहू आणि या प्रकल्पाला विरोध करू, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
राजापूरच्या जवाहर चौकातील पूर्णाकृती शिवपुतळ्याचे अनावरण ठाकरे यांच्याहस्ते झाले. यावेळी राजापूर तालुक्यातील नाणार, सागवे परिसरातील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्रकल्पविरोधाचे निवेदन सादर केले.
यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना सरकारमध्ये आहे. पण शिवसेनेचे प्राधान्य लोकांना आहे. लोकांना जे हवे असेल तेच होईल. या प्रकल्पाला जनतेचा विरोध असेल तर शिवसेनाही या प्रकल्पाला विरोधच करेल, असे त्यांनी सांगितले.