Two workers killed in Ratnagiri collapse in Kadapa; Four injured | कडाप्पे अंगावर पडून रत्नागिरीत दोन कामगार ठार; चार जखमी
कडाप्पे अंगावर पडून रत्नागिरीत दोन कामगार ठार; चार जखमी

रत्नागिरी : अंगावर ५० ते ६० मोठ्या लाद्या पडून दोन कामगार ठार झाले तर चारजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी रात्री उशीरा शहरातील उद्यमनगर भागात घडली. 

उद्यमनगर भागात महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी रात्री लाद्या उतरवून घेण्याचे काम सुरू होते. तेथे पुरेसा उजेड नव्हता. हे काम सुरू असताना सहा कामगारांच्या अंगावर ५० ते ६० मोठ्या लाद्या पडून ते गंभीर जखमी झाले.

ठेकेदाराने कोणालाही न कळवता या बेशुद्ध कामगारांना ऍम्ब्युलन्समधून शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. ठेकेदार व साईट सुपरवायझर च्या हलगर्जीपणामुळे ही गंभीर घटना घडल्याचे समजते. आता पोलिसांनी यात लक्ष घातले असून, नेमका कसा आपघात घडला याची माहिती पोलीस घेत आहेत.

Web Title: Two workers killed in Ratnagiri collapse in Kadapa; Four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.