शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: पोहताना लाटेत वाहत गेले, आरे-वारे समुद्रात दोघे बुडाले; एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:12 IST

पालघर येथील कुटुंबाच्या आनंदावर विरजण, एकाला वाचविण्यात यश

रत्नागिरी : समुद्रात पाेहत असताना लाटेमध्ये वाहत जाऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२९ मार्च) सकाळी १० वाजण्याच्या सुमाराला रत्नागिरी तालुक्यातील आरे-वारे येथे घडली. संताेष शशिकांत भानुशाली (वय ५०, रा.नाईक काॅम्प्लेक्स भाजी मार्केट वाडा, ता. वाडा, जि.पालघर) असे मृताचे नाव आहे, तर याेग राजेश भानुशाली याला वाचवण्यात आले.याबाबत पूर्णा संताेष भानुशाली (वय २२) यांनी रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकात माहिती दिली. त्यानुसार, त्यांचे वडील संताेष भानुशाली आणि कुटुंब रविवारी फिरण्यासाठी रत्नागिरी येथे आले हाेते. हे सर्वजण सकाळी ९:३० वाजण्याच्या दरम्यान रत्नागिरी - गणपतीपुळे मार्गावरील आरे-वारे समुद्रकिनारी गेले हाेते. त्या ठिकाणी थाेडा वेळ फिरून त्यांनी फाेटाेही काढले. त्यानंतर, सर्व जण समुद्राच्या पाण्यात पाेहण्यासाठी गेले हाेते. पाण्यात पाेहत असताना संताेष भानुशाली, तसेच मानव, याेग व वरद असे पाण्यात पुढे पुढे पाेहण्यासाठी जात हाेते. त्याच वेळी समुद्राची माेठी लाट आली आणि चाैघेही लाटेमध्ये मागे पुढे हाेऊ लागले. यातून मानव आणि वरद हे समुद्राच्या पाण्यातून तत्काळ बाहेर आले. मात्र, संताेष भानुशाली आणि याेग राजेश भानुशाली हे समुद्राच्या लाटेबराेबर वाहत गेले. समुद्राच्या पाण्यात ओढले जाताच त्या ठिकाणी रेस्क्यू करणाऱ्या व्यक्तींनी धाव घेतली. त्यांनी दाेघांना समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढले. त्यावेळी याेग भानुशाली हा शुद्धीवर हाेता, तर संताेष भानुशाली हे बेशुद्धावस्थेत हाेते.त्यांना खासगी वाहनातून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संताेष भानुशाली यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले, तर याेग भानुशाली याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.याबाबत रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा २०२३ चे कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास ग्रामीण पाेलिस करत आहेत.

पीसीआर दिला पण...संताेष भानुशाली यांना पाण्याबाहेर काढले असता ते बेशुद्ध पडलेले हाेते. रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या व्यक्तींनी त्यांना पीसीआर दिला. त्यावेळी त्यांचा साधारण श्वास सुरू असल्याचे दिसले. त्यानंतर, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना वाचविण्यात यश आले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Two Drown in Aare-Ware Sea; One Dead

Web Summary : A tourist drowned and another was rescued at Aare-Ware beach in Ratnagiri after being swept away by a wave. Santosh Bhanushali, 50, was declared dead at the hospital. Police have registered a case of accidental death and are investigating.