Ratnagiri: शिसे चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा; दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:00 IST2025-10-10T16:00:14+5:302025-10-10T16:00:55+5:30

विशेष तपास पथक

Two arrested for recovering 460 kg of stolen lead from Katli Sada in Rajapur taluka | Ratnagiri: शिसे चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा; दोघांना अटक

Ratnagiri: शिसे चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा; दोघांना अटक

राजापूर : तालुक्यातील कातळी सडा येथील चोरीस गेलेले तब्बल १,४७,२०० रुपये किमतीचे ४६० किलो वजनाचे शिसे १२ तासांत हस्तगत करण्यात नाटे सागरी पोलिसांना यश आले आहे. या चोरीत सहभागी असलेल्या दोन आरोपींना पाेलिसांनी अटक केली आहे.

मुबिन अब्दुल सत्तार सोलकर (वय ३०, रा. धालवली-मुस्लिमवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग), समीर कुदबुद्दिन सोलकर (रा. कातळी, ता. राजापूर) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत नासीर इसहाक मजगावकर (४७, रा. कातळी, राजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. चंद्रशेखर रजनीकांत कुश्ये (रा. मेढा, ता. मालवण) यांच्या मालकीचे पर्सनेट मच्छिमारी जाळे त्यांनी दुरुस्तीसाठी आणून कातळी सडा येथील शब्बीर नाखेरकर यांच्या कंपाउंडमध्ये १८ जूनला काळ्या ताडपत्रीने झाकून ठेवले होते. 

मात्र, दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी तपासणी केली असता जाळीला लावलेले सुमारे ६४० किलो वजनाचे शिसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नाटे सागरी पोलिस स्थानकात ८ ऑक्टाेबर राेजी फिर्याद देताच पाेलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला हाेता. पाेलिसांनी मुबिन अब्दुल सत्तार सोलकर आणि समीर कुदबुद्दिन सोलकर या दाेघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय झगडे करत आहेत.

विशेष तपास पथक

चाेरीच्या तपासासाठी सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले हाेते. तपासादरम्यान तांत्रिक साधनांचा वापर आणि गोपनीय माहितीच्या आधारे पाेलिसांनी संशयितांचा शोध घेतला.

Web Title : रत्नागिरी: 12 घंटे में सीसा चोरी का पर्दाफाश, दो गिरफ्तार

Web Summary : रत्नागिरी पुलिस ने 12 घंटे में सीसा चोरी का मामला सुलझाया, ₹1,47,200 का चोरी का सीसा बरामद किया और दो लोगों को गिरफ्तार किया। चोरी राजापुर तालुका के कटली साडा में हुई। आगे की जांच चल रही है।

Web Title : Ratnagiri: Lead Theft Cracked in 12 Hours; Two Arrested

Web Summary : Ratnagiri police solved a lead theft case in 12 hours, recovering stolen lead worth ₹1,47,200 and arresting two individuals involved. The theft occurred in Katali Sada, Rajapur Taluka. Further investigation is underway.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.