निवळी येथे ट्रकला अपघात, चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 16:52 IST2021-05-04T16:51:07+5:302021-05-04T16:52:42+5:30
Accident Ratnatgiri : धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल होऊन निवळी (ता. रत्नागिरी) येथे मंगळवारी दुपारी १२.१५ वाजता अपघात झाला. या अपघातात चालक श्रीराम शशिकांत प्रसादे (५२, रा. देवरूख) याचा जागीच मृत्यू झाला.

निवळी येथे ट्रकला अपघात, चालकाचा मृत्यू
रत्नागिरी : धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल होऊन निवळी (ता. रत्नागिरी) येथे मंगळवारी दुपारी १२.१५ वाजता अपघात झाला. या अपघातात चालक श्रीराम शशिकांत प्रसादे (५२, रा. देवरूख) याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी श्रीराम शशिकांत प्रसादे हा ट्रक (एमएच ०४, ईवाय ९२०३) मध्ये निवळी येथील मासेबाव गोडावूनमधील धान्य घेऊन संगमेश्वरकडे जात होते. निवळी येथील दत्तमंदिर येथील वळणात आल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्याला गाडीवर नियंत्रण मिळवता आल्याने गाडी समोरील डोंगरावर जाऊन आदळली. त्यामध्ये गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.
या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष कांबळे, अजय कांबळे व संजय झगडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला.