भोके येथे वृक्षवाटप कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:30+5:302021-08-13T04:36:30+5:30

हातखंबा : लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने भोके येथे लायन ॲड. ...

Tree distribution program at Bhoke | भोके येथे वृक्षवाटप कार्यक्रम

भोके येथे वृक्षवाटप कार्यक्रम

Next

हातखंबा : लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने भोके येथे लायन ॲड. महेंद्र मांडवकर यांनी दिलेली काजूची ४० झाडे आणि सागवानाची १० झाडे अशा एकूण ५० झाडांचे वितरण डॉ. शेखर कोवळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

यावेळी झोन चेअरमन प्रमोद खेडेकर, सुनीलदत्त देसाई, रत्नागिरी क्लबच्या अध्यक्ष ॲड. शबाना वस्ता, हातखंबा क्लबचे अध्यक्ष मनोज खानविलकर, डॉ. पराग पानवलकर, यश राणे उपस्थित होते. हातखंबा क्लबचे सचिव सैफुद्दीन पठाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हातखंबा क्लबचे मंगेश जाधव व मनस्वी जाधव यांच्या घरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात ज्यांच्या घरी कमावते कोणी नाही, ज्या शेतकऱ्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे अशा गरजू शेतकऱ्यांची वृक्ष वाटपासाठी मंगेश जाधव यांनी निवड केली हाेती. यावेळी खजिनदार गिरीष शितप, स्नेहा सागवेकर, ॲड. अवधूत कळंबटे, सचिन सावेकर, शुभाली झगडे, पोलीस पाटील संदेश शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सचिव सैफुद्दीन पठाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Tree distribution program at Bhoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.