शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

सुब्रमण्यम् सुबू याची कन्याकुमारी ते काश्मीर भारतभर भ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 4:11 PM

एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या महाव्यवस्थापन पदावर कार्यरत असलेला एक अवलिया वाहतूक सुरक्षा व अपघात सुरक्षेचा संकल्प घेत कन्याकुमारी ते काश्मीर असा संपूर्ण भारतभर भ्रमण करीत आहे तो ही चक्क चालत. या त्याच्या संकल्पपूर्तीसाठी त्याने ३६०० किलोमीटरचे अंतर चालायला सुरुवात केली आहे, त्याचे नाव आहे सुब्रमण्यम नारायणन सुबू.

ठळक मुद्देसुब्रमण्यम् सुबू याची कन्याकुमारी ते काश्मीर भारतभर भ्रमणवाहतूक सुरक्षेसाठी त्याचा पायी प्रवास, वॉक डोनेशन संकल्प

आनंद त्रिपाठीवाटूळ : एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या महाव्यवस्थापन पदावर कार्यरत असलेला एक अवलिया वाहतूक सुरक्षा व अपघात सुरक्षेचा संकल्प घेत कन्याकुमारी ते काश्मीर असा संपूर्ण भारतभर भ्रमण करीत आहे तो ही चक्क चालत. या त्याच्या संकल्पपूर्तीसाठी त्याने ३६०० किलोमीटरचे अंतर चालायला सुरुवात केली आहे, त्याचे नाव आहे सुब्रमण्यम नारायणन सुबू.सुब्रमण्यम हे ५० वर्षीय उच्चशिक्षीत गृहस्थ तरुणांनाही लाजवेल या उत्साहात २८ जुलैपासून पायी चालत आता रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर राजापूर येथे दाखल झाले आहेत. कन्याकुमारीहून २८ जुलै रोजी त्यांचा पायी प्रवास सुरु झाला असून, काश्मिरपर्यंत जवळजवळ ३६०० किलोमीटरचे अंतर ६० दिवसात पूर्ण करण्याचा त्यांचा इरादा आहे.हेल्ला या बहुराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर कार्यरत असलेल्या सुब्रमण्यम यांना त्यांच्याच कंपनीने या अभिनव संकल्पासाठी आर्थिक मदत केली असून, एक प्रशस्त कार व आपल्या दहा सहकाऱ्यांसमवेत सुब्रमण्यम यांनी हा प्रवास सुरु केला आहे.कन्याकुमारी ते काश्मीर हे संपूर्ण अंतर फक्त एकटे सुब्रमण्यमच चालणार आहेत. आपल्या देशातील रस्त्यांची अवस्था, सतत होणारे अपघात व वाहतूक सुरक्षा यांच्या जनजागृतीसाठी आपली ही मोहीम असून, भारतात दररोज ४०० लोक रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडत आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठीच आपण ही मोहीम सुरु केल्याचे सुब्रमण्यम यांनी सांगितले.चांगले रस्ते कर्नाटकातच!आतापर्यंत आपणाला सगळ्यात चांगले रस्ते फक्त कर्नाटकमध्येच मिळाले. तिकडे रस्त्यांवर वाहनांची गर्दीही कमी प्रमाणात दिसते, असेही सुब्रमण्यम म्हणाले. त्यांच्या या मोहिमेला अनेक ह्यएन.जी.ओ.ह्णचा पाठिंबा असून, शासनानेदेखील या संकल्पनेचे स्वागत केले आहे. दररोज पहाटे ३ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते ७ असे १२ तासात ६० ते ६५ किलोमीटर अंतर ते चालतात.पाऊल डोनेट कराआम्हाला या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्वसामान्य नागरिकांकडून डोनेशन हवे आहे. परंतु, ते डोनेशन पैसे नको तर स्टेप (पाऊल) हवे आहे. त्यासाठी गुगलवरुन वन करोड स्टेप.कॉम हे अ‍ॅप घ्या व दररोज १०० ते २०० स्टेप चाला व ते आम्हाला डोनेट करा, असे आवाहन ते करतात. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRatnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडी