उंबर्ले येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST2021-09-26T04:34:00+5:302021-09-26T04:34:00+5:30

दापोली : कोकण कृषी महाविद्यालय दापोली येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी नीलम जालगावकर, कुमेधा सुतार यांनी उंबर्ले ...

Training of farmers at Umberley | उंबर्ले येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

उंबर्ले येथे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

दापोली : कोकण कृषी महाविद्यालय दापोली येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी नीलम जालगावकर, कुमेधा सुतार यांनी उंबर्ले येथील शेतकरी सखाराम जालगावकर यांच्या शेतावर भात पिकावरील कीड नियंत्रण कसे करावे, याची माहिती दिली.

भातावरील कीड भाताचे कोवळे पान तोडून त्याचे लहान तुकडे करते आणि त्याची सुरळी करून त्यात राहते. तिलाच ‘सुरळी अळी’ असे म्हणतात. रात्रीच्या वेळी अळी भाताच्या आव्यावर चढते आणि पानातील हरितद्रव्य खरडवून खाते. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येते. पिकाची वाढही होत नाही. भातावरील सुरळ्या पानाच्या एका कडेला लटकत किंवा पाण्यावर तरंगत असलेल्या निदर्शनास येतात. अशावेळी अळीच्या नियंत्रणासाठी शेतात पाणी अडवून उभ्या पिकावरून एक दोरखंड आडवा धरून ओढत न्यावा, त्यामुळे पिकावरील अळी पडते. अळ्या खाली पडल्यानंतर एक दोन तासांनी शेतातील पाणी एका बाजूला सोडावे. जेणेकरून सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा होतील त्यानंतर त्या नष्ट कराव्यात, असा सोपा उपाय यावेळी शेतकऱ्यांना सांगितला.

Web Title: Training of farmers at Umberley