शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

सुटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनस्थळे गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:49 AM

उन्हाळी सुटीमुळे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गणपतीपुळे, पावस या धार्मिक स्थळांसह सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. आरेवारे मार्गावर पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. हॉटेल्स, लॉजिंगसह यात्री निवासमध्येही गर्दी वाढली आहे.

ठळक मुद्देसुटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनस्थळे गजबजली, कोकणी मेव्याचा आस्वाद पर्यटकांच्या वाहनांमुळे महामार्गावर लांबच लांब रांगा

रत्नागिरी : उन्हाळी सुटीमुळे जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गणपतीपुळे, पावस या धार्मिक स्थळांसह सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. आरेवारे मार्गावर पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. हॉटेल्स, लॉजिंगसह यात्री निवासमध्येही गर्दी वाढली आहे.शाळा, महाविद्यालयांना दीर्घ सुटी असल्याने जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी झाली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळानेदेखील प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई, पुणे मार्गावर उन्हाळी सुटीनिमित्त जादा गाड्या सुरू केल्या आहेत. एस. टी.च्या शिवशाही बसेसनाही प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.शेजारच्या जिल्ह्यातून एक दिवसीय सहल काढून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पर्यटक खासगी वाहनातून एक दिवसाच्या सहलीसाठी येत आहेत. गुहागर, मार्लेश्वर, गणपतीपुळे, रत्नागिरी, पावस, आडीवरे या ठिकाणी येण्याचा कल वाढला आहे. ठराविक भाडे ठरवून मंडळी खासगी बसेस, १६ सीटर, ४० सीटर गाड्या, छोट्या कार यांना मागणी वाढली आहे. एसी, नॉन एसी अशा वर्गवारीमध्ये किलोमीटरचे दर ठरविण्यात येत आहेत.उन्हाळी सुटीबरोबर कोकणी मेव्याचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावले कोकणाकडे वळत आहेत. एस. टी. बसेस, रेल्वे, खासगी आराम बसेसना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. प्रवाशांनी फुल्ल भरून गाड्या पळत आहेत. गणपतीपुळे, आरे-वारे, काजिरभाटी, मांडवी, भाट्ये बीच, गुहागर, राजापूर, मार्लेश्वर, रत्नागिरी, दापोली, याठिकाणी राज्यासह परराज्यातील पर्यटकांनी गर्दी केली आहे.

सुटीमुळे गणपतीपुळे, पावस परिसरात पर्यटक बहुसंख्येने आले आहेत. सागरी महामार्गाने प्रवास करीत असल्यामुळे शिरगाव येथील अरूंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. रत्नागिरी करून गोव्याला जाणारे पर्यटकही अधिक आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. रत्नागिरी, गणपतीपुळे दर्शनानंतर माघारी फिरणारेही अधिक आहेत. कोल्हापूर मार्गावरही पर्यटकांची वाहने अधिक आहेत. गर्दीमुळे गणपतीपुळे परिसरातील गावांमध्ये पर्यटक निवासासाठी थांबत आहेत.समुद्रस्नानाचा आनंदसमुद्रात बोटिंग, किनाऱ्यावर घोडेस्वारी, परचुरी खाडीत मगर सफर, माडा पोफळींच्या बागेत कोकणी लोककलांचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वाळूत खेळण्याबरोबर समुद्रस्नानाचा आनंदही पर्यटक लुटत आहेत. दाभोळ-धोपावे मार्गावरील फेरीबोटही फायदेशीर ठरत आहे.

टॅग्स :tourismपर्यटनRatnagiriरत्नागिरी