चिपळुणात तीन शिक्षक पॉझिटिव्ह, दोन दिवसात ६१० जणांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 03:26 PM2020-11-21T15:26:59+5:302020-11-21T15:36:45+5:30

coronavirus, teacher, educationsector, chiplun, ratnagirinews येत्या सोमवारपासून तालुक्यातील शाळा व महाविद्यालये सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची स्वॅब व अँटिजेन तपासणी केली जात आहे. दोन दिवसांत ६१० जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी तीन शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

Three teachers tested positive in Chiplun, 610 tested in two days | चिपळुणात तीन शिक्षक पॉझिटिव्ह, दोन दिवसात ६१० जणांची तपासणी

चिपळुणात तीन शिक्षक पॉझिटिव्ह, दोन दिवसात ६१० जणांची तपासणी

Next
ठळक मुद्देचिपळुणात तीन शिक्षक पॉझिटिव्ह, दोन दिवसात ६१० जणांची तपासणी शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर कार्यवाही

चिपळूण : येत्या सोमवारपासून तालुक्यातील शाळा व महाविद्यालये सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांची स्वॅब व अँटिजेन तपासणी केली जात आहे. दोन दिवसांत ६१० जणांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी तीन शिक्षक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

२३ नोव्हेंबरपासून शाळा, महाविद्यालये सुरु होणार असल्याने प्रत्येक शिक्षकाला वैद्यकीय तपासणी बंधनकारक केली आहे. त्याबाबतचा वैद्यकीय अहवाल दिल्याशिवाय शिक्षकांना शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.

गेल्या दोन दिवसांत कामथे उपजिल्हा रुग्णालयात प्राध्यापक व शिक्षकांची तपासणी केली जात आहे. तसेच पवन तलाव मैदान येथील केंद्र व तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात ६१० जणांची तपासणी केली. यामध्ये तीन शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे येथील प्रशासकीय यंत्रणा पुन्हा एकदा खडबडून जागी झाली आहे.

पालकांकडून लेखी पत्र

विद्यार्थ्यांच्या पालकांकडून स्वतःच्या जबाबदारीवर पाल्याला शाळा किंवा महाविद्यालयात पाठविण्यात येत असल्याचे लेखी पत्र घेतले जात आहे. शिवाय एका वर्गात ४० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे.

Web Title: Three teachers tested positive in Chiplun, 610 tested in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.