शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात तीनजणांचा कोरोनाने मृत्यू, ६४ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST

राजापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राजापूर तालुक्यात ग्रामीण भागात हात-पाय पसरले असतानाच, राजापूर शहरातही दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढू ...

राजापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राजापूर तालुक्यात ग्रामीण भागात हात-पाय पसरले असतानाच, राजापूर शहरातही दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवारी राजापुरात एस.टी. बसस्थानक परिसरात गुरववाडी व बंगलवाडी येथे दोन जणांचा, तर यापूर्वी चव्हाणवाडी भागात एकाचा, असा तीन जणांचा मृत्यू झाला. तसेच सध्या ६६ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गुरववाडी भागातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. तसेच हा भाग कंटेन्मेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. शहरात कोरोनाने तीन जणांचा झालेला मृत्यू आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, शहरातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे व मुख्याधिकरी देवानंद ढेकळे यांनी केले आहे.

राजापूर शहरात चव्हाणवाडी परिसरातील एका कोरोनाबाधित रुग्णाचा यापूर्वीच मृत्यू झाला होता, तर रविवारी गुरववाडी येथील एकाचा व बंगलवाडी येथील एकाचा मृत्यू झाला आहे. गुरववाडी येथील व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्यानंतर हा परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.

तसेच बंगलवाडी येथील ज्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तो रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर रायपाटण कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू होते. उपचारानंतर घरी आल्यानंतर त्याचा रविवारी मृत्यू झाला आहे. या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबातीलही व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यामुळे त्यांना ‘होम आयसोलेट’ करण्यात आल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत राजापूर शहरात ४ जानेवारी ते ३ मे या कालावधीत एकूण ८४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. यापैकी २० जण बरे झाले असून, ६४ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एस.टी. बसस्थानक गुरववाडी परिसरात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीने, या भागात झालेल्या एका लग्नसमारंभाला उपस्थिती लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे या भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. शहरात सर्वच प्रभागात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये शहर बाजारपेठ, झरीरोड, ओगलेवाडी, दिवटेवाडी, साखळकरवाडी, गुजराळी, भटाळी, आंबेवाडी, चव्हाणवाडी, यश अपार्टमेंट, बंगलवाडी, गुरववाडी या परिसरात कोरोना संसर्गाचे रुग्ण असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.