शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

Coronavirus Unlock - गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात हजारो भाविकांना दर्शनाची पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 1:06 PM

Ganpatipule Mandir, Ratnagiri, Coronavirus Unlock गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात सोमवार, दिनांक १६ रोजी येथील स्थानिक ग्रामस्थांसह हजारो पर्यटकांनी श्री दर्शनाची पर्वणी साधत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन यांनी विशेष काळजी घेतली होती.

ठळक मुद्देगणपतीपुळे तीर्थक्षेत्रात हजारो भाविकांना दर्शनाची पर्वणीदेवस्थान प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन यांनी घेतली विशेष काळजी

गणपतीपुळे : गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात सोमवार, दिनांक १६ रोजी येथील स्थानिक ग्रामस्थांसह हजारो पर्यटकांनी श्री दर्शनाची पर्वणी साधत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन यांनी विशेष काळजी घेतली होती.पहाटे ४ वाजता स्वयंभू श्री गजाननाची शोडशोपचारे पुजा करण्यात आली. त्यानंतर ५ वाजता महाआरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. प्रथम ५.३० ते ७.३० या वेळेत स्थानिक ग्रामस्थांना दर्शनासाठी राखीव ठेवण्यात आला होता. यावेळी मालगुंड, नेवरे, भगवतीनगर, निवेंडी, वरवडे, धामणसे, जाकादेवी, रत्नागिरी आदी ठिकाणाहून स्थानिक ग्रामस्थांनी श्री दर्शन घेतले.

प्रथमत: कोरोनाची लाट आली त्या पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानानंतर कोरोनामधून सावरतानाच अर्थकारण सर्वच ठिकाणातून कोलमडण्याचे मोठे संकट होते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मंदिरे पुन्हा एकदा चालू करण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा येथील लॉज व्यावसायिक, हॉटेल्स व्यावसायिक, समुद्रावरील छोटे मोठे व्यावसायिक यांना होईल, यात शंकाच नाही. येत्या काही दिवसांतच गणपतीपुळे परिसरात समाधानकारक गर्दी होईल.सहा फुटाचे अंतरमंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे ६ फुटांचे चौकोन आखण्यात आले असून, हे चौकोन सुमारे २०० इतके आहेत. तसेच मंदिरात प्रवेश करताना मास्क बंधनकारक असून, यावेळी प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायझर मारताना दिसत होते.भाद्रपदी गणेश उत्सवातही गणपतीपुळे येथील व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांची कोरोना महामारीमुळे श्रींचे दर्शन घेतले नव्हते. मंदिर सुरु झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती. केवळ जिल्ह्यातीलच नाही तर मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील असंख्य भाविक गणपतीपुळेत दाखल झाले आहेत.

मंदिर प्रशासन व मुख्य पुजारी यांच्या समन्वयामुळे आज दिवसभर कोणतीही अडचणी आली नाही. पहाटे ४ वाजता श्रींची विधीवत शोडशोपचारे पुजा तसेच ५ वाजता श्रींची आरती व ५.३० वाजता मंदिर दर्शनासाठी खुले झाले. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे.- अमित घनवटकरमुख्य पुजारी

कोरोनाच्या महामारीमुळे गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात येण्याचा योग येत नव्हता. मात्र, गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील स्वयंभू श्री गजाननाचे श्याम म्हणजे आराध्य दैवत काल रात्री आम्ही मुंबईहून निघालो व आज सकाळी पोहोचलो. सकाळी ८ ते १२ या वेळेत आमचे चांगले दर्शन झाले. संस्थान गणपतीपुळे यांनी चांगली व्यवस्था कोरोनाच्या महामारीत ठेवली. स्वयंभू श्री गजाननाचे दर्शन झाल्यामुळे मी खूश आहे.- रंजना राजेशिर्के,चारकोप, बोरिवली.

टॅग्स :Ganpatipule Mandirगणपतीपुळे मंदिरRatnagiriरत्नागिरीCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकReligious Placesधार्मिक स्थळे