शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

उटंबर-डायरा येथे चोराला पकडले

By admin | Updated: September 15, 2015 00:02 IST

हिमतखान दर्गा : रात्रीच्या अंधारात रंगला पाठलागाचा थरार

दापोली : दापोली तालुक्यातील उटंबर - डायरा येथील हिमतखान दर्ग्याची दानपेटी फोडून बंद घरात चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अब्दुल रहिमान इस्माईल शेख (२९, गोरेगाव, रायगड) येथील तरुणाला ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. संशयित आरोपी अब्दुल रहेमान इस्माईल शेख गेली दोन दिवस या परिसरात फिरत असताना स्थानिकांना आढळला होता. रविवारी रात्री ९ च्या सुमारास हिमतखान दर्ग्याची दानपेटी फोडली. त्यातील रकमेने समाधान न झाल्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. मात्र, शेजाऱ्यांना काहीतरी आवाज आल्याने शेजाऱ्याने कानोसा घेतला. बंद घराचा दरवाजा उघडा दिसल्याने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता अंधाराचा फायदा घेऊन चोरटा पळत सुटला. परंतु या गावातील तरुणाने त्याचा पाठलाग करुन पकडले. बराच वेळ रंगलेले हे पाठलागाचे नाट्य ग्रामस्थांनी चोरट्याला पकडल्यानंतरच संपवले. स्थानिकांनी चोरट्याची धुलाई करुन मगच पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्याला पकडण्यासाठी सागरी सुरक्षा दलाचे प्रकाश खोत, मजीद चौगुले, जाकीर होडेकर, फयाज बोरकर, जहूर झोंबडकर, मकबूल चाऊस यांनी सहकार्य केले. दापोली तालुक्यात इतर चोऱ्यांशी या चोरट्याचा काही संबंध आहे का? तो एकटाच चोरी करतो की, त्याच्यासोबत अजून काही साथीदार आहेत, याचा दापोली पोलीस कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाची फिर्याद मकबूल दिनवारे यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता. याबाबतचा अधिक तपास दापोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेलार, आडे दूरक्षेत्राचे अंमलदार सुरेश खरात करत आहेत. (प्रतिनिधी)