Ratnagiri: ‘दृश्यम’ची पुनरावृत्ती; खड्डा खोदून दफन केले, चर्चेला उत आला; पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 12:17 IST2025-05-22T12:17:12+5:302025-05-22T12:17:46+5:30

दोडामार्ग तिलारी रस्त्यावरील प्रकार

They dug a pit on the side of the road near Kudasa Titha on Dodamarg Tilari Road and buried it, but it turned out to be a mistake | Ratnagiri: ‘दृश्यम’ची पुनरावृत्ती; खड्डा खोदून दफन केले, चर्चेला उत आला; पण..

Ratnagiri: ‘दृश्यम’ची पुनरावृत्ती; खड्डा खोदून दफन केले, चर्चेला उत आला; पण..

दोडामार्ग : दोडामार्ग तिलारी रस्त्यावरील कुडासा तिठा नजिक असलेल्या साईडपट्टीवर खड्डा खोदून त्यामध्ये काहीतरी दफन करण्यात आले आहे. दफन केल्यानंतर त्यावर फुलांची मोठी रास आणि त्यावर दगड ठेवण्याचा प्रकार उघड झाल्याने दोडामार्ग तालुक्यात विविध चर्चाना उत आला आहे.

ही घटना भेडशी येथील युवकांच्या जागृतेमुळे उघड झाली. रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी हा खड्डा सकाळी खोदून काय ते पाहू असे सांगितले. दरम्यान मंगळवारी दुपारी याठिकाणी ही दफन केलेली जागा पुन्हा उकरण्यात आल्यानंतर त्यामध्ये मृत पाळीव कुत्रा दफन केल्याचे उघड झाल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

रविवारी रात्रीच्या सुमारास या ठिकाणी दोन चारचाकी उभ्या असल्याचे या मार्गावरून जाणाऱ्या काहीजणांनी पाहिले होते. मात्र काही कामानिमित्त थांबले असतील असा त्यांचा समज झाला. सोमवारी दुपारी भेडशी येथील पांडुरंग बेळेकर यांना याठिकाणी काहीतरी पुरुन त्यावर फुले टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी नजीकच्या जमीन मालकांकडे चौकशी केली. मात्र त्यांनाही याबाबत काही माहिती नसल्याचे समजले.

दरम्यान बेळेकर यांनी ही गोष्ट आपल्याच गावातील काही जणांनां सांगितली. सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास नेमका हा प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी भेडशी येधील पत्रकार जय भोसले, गोविंद शिरसाठ, दादा टोपले आदी ग्रामस्थ यांनी याठिकाणी जात पाहणी केली. सुरुवातीला हा प्रकार देव देवस्कीचा वाटत होता. मात्र नंतर अधिक जवळ जाऊन पाहिले असता याठिकाणी काहीतरी दफन केल्याचे दिसून येत होते.

याबाबत तातडीने दोडामार्ग पोलिसांना कळवण्यात आले. तेथील बिट अंमलदार संजय गवस, पोलिस नाईक हे लगेचच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही पाहणी करून काहीतरी दफन केल्याचे स्पष्ट केले आणि त्यानंतर खोदकाम करण्यात आले.

कुत्रा पुरल्याचे झाले उघड

दुपारी १ वाजन्याच्या सुमारास दोडामार्ग प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने, पोलिस निरीक्षक हेमचंद खोपडे व साटेली भेडशी सरपंच छाया धर्णे, तलाठी, पोलिस पाटील, यांच्या समक्ष खड्डा उघडण्यात आला. खड्डा खोदत असताना कुजलेला वास सर्वत्र पसरू लागला जसजसा खड्डा खोदून झाला तस लोकांच्या नजरा खड्ड्याकडे झूकू लागल्या पाहता तर काय त्याठिकाणी कुत्रा पुरल्याचे उघड झाल्याने साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.

Web Title: They dug a pit on the side of the road near Kudasa Titha on Dodamarg Tilari Road and buried it, but it turned out to be a mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.