शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आंबा उत्पादन कमीच, वाशीमधील विक्रेते प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:22 IST

रत्नागिरी : हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मोहर काळा पडून गळून गेला आहे. मेल ...

रत्नागिरी : हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मोहर काळा पडून गळून गेला आहे. मेल मोहराचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे फळधारणा न झाल्याने यावर्षी जेमतेम १५ ते २० टक्केच आंबा उत्पादन झाले आहे. सद्यस्थितीत कोकणातून दिवसाला ४०० ते ५०० आंबा पेट्या विक्रीला वाशी बाजारात जात आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्यांची संख्या केवळ १०० ते १५० इतकेच आहे.यावर्षी नोव्हेंबरपर्यंत पाऊस लांबल्याने फुलोरा मोठ्या प्रमाणावर आला. परंतु, कडाक्याच्या थंडीमुळे आवश्यक फळधारणा झालीच नाही, शिवाय मोहर काळा पडला. या परिस्थितीमुळे खत व्यवस्थापनापासून मोहर, फळे वाचविण्यासाठी बागायतदारांनी केलेला खर्चही वाया गेला आहे. सुरुवातीच्या काळात आंबा पिकाचे प्रमाण कमी राहिल्याने बाजारात पुरेसा आंबा दाखल झाला नाही. हवामानातील बदलामुळे बहुतांश आंबा हा दि. २० मार्चपासूनच तयार होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक बदलाचा परिणाम आंबा पिकावर हाेत असतानाच काही बागायतदारांनी माेठ्या कष्टाने हा आंबा वाचविला. हा तयार झालेला आंबा बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.वाशी बाजारात कोकणातून माेठ्या प्रमाणात हापूस आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येताे. मात्र, यावर्षी उत्पादनच कमी झाल्याने वाशी बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या आंब्याचे प्रमाण कमी आहे. सध्या ४०० ते ५०० पेट्या वाशीला जात असून, त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अवघ्या १०० ते १५० पेट्यांचा समावेश आहे. त्या तुलनेने तामिळनाडू राज्यातून हापूस, बदामी, लालबा, नीलम, ताेतापुरी या प्रकारच्या आंब्याच्या ५००० पेट्या वाशी बाजारात येत आहेत. तामिळनाडूच्या तुलनेत कोकणातील आवक अत्यल्प आहे.

सहा ते दहा हजार रूपये दरसध्या आवक कमी असल्यामुळे आंबा पेटीला सहा ते दहा हजार रूपये दर मिळत आहे. यावर्षी आंबा उत्पादनच कमी असल्यामुळे दर टिकून राहतील, असे सांगण्यात येत आहे.

गतवर्षी आवक जास्त दर कमीगतवर्षी याच हंगामात कोकणातून दिवसाला ४ ते ५ हजार पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात येत असत. यावर्षी ते प्रमाण ४०० ते ५०० पेट्या इतकेच आहे. गतवर्षी पेटीला २ ते ६ हजार रूपये दर मिळत होता, यावर्षी आवक कमी असल्यामुळे ६ ते १० हजार रूपये दर मिळत आहे.

यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादनच कमी आहे. त्यामुळे बाजारपेठेतील आवक मंदावली आहे. गुढीपाडव्यानंतर आवक वाढेल. परंतु, दरवर्षीपेक्षा यावर्षी आंबाच कमी असल्यामुळे प्रमाण कमी असेल. उत्पादन कमी असल्यामुळे दर टिकण्याची शक्यता आहे. - संजय पानसरे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई.

English
हिंदी सारांश
Web Title : Low Mango Production: Vashi Market Vendors Await Supplies

Web Summary : Erratic weather slashed mango yields to 15-20%. Ratnagiri sends few boxes to Vashi. Tamil Nadu dominates the market. Prices are high, ₹6,000-₹10,000/box, due to scarcity, unlike last year's higher supply and lower rates. Limited supply impacts Vashi arrivals.