शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

..तर तहसीलदारांचे निलंबन, आमदार भास्कर जाधवांच्या प्रश्नावर महसूल मंत्र्यांचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:53 IST

चिपळूण : सक्शन पंपाने वाळू उत्खनन करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी सक्शन पंप लावून अवैधरीत्या वाळू ...

चिपळूण : सक्शन पंपाने वाळू उत्खनन करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी सक्शन पंप लावून अवैधरीत्या वाळू उत्खनन सुरू आहे त्या सर्व ठिकाणचे सक्शन पंप तहसीलदारांनी तत्काळ काढून टाकावेत, अन्यथा संबंधित तहसीलदारांचे निलंबन करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले.राज्याच्या वाळू धोरणावर सभागृहात चर्चा सुरू असतानाच आमदार भास्कर जाधव यांनी कोकणात हातपाटी वाळू उपसा हा पारंपरिक व्यवसाय आहे. त्याला आमचा विरोध नाही; परंतु अनेक ठिकाणी सक्शन पंप लावून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले जात आहे. त्याला फक्त वाळू व्यावसायिक नव्हे, तर सरकारी कर्मचारीही जबाबदार आहेत. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय कोणतेही अवैध धंदे चालू शकत नाहीत. अशांवर कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला.त्यावर उत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले, सरकारचे वाळू धोरण येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे. त्याचा मसुदा अंतिम टप्प्यात आहे. सदस्यांच्या काही सूचना असतील तर त्यांनी जरूर द्याव्यात, तसेच आमदार जाधव यांनी उपस्थित केलेला सक्शन पंपाचा मुद्दा अतिशय गंभीर आहे. सक्शन पंपाने वाळू उत्खनन करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे आजच मी कोकण आयुक्तांना आदेश देतोय की, तत्काळ सक्शन पंप बंद करण्यात यावेत. तहसीलदारांनी ही कारवाई केली नाही, तर संबंधित तहसीलदारावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशा शब्दांत बावनकुळे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Vidhan Bhavanविधान भवनAgriculture Sectorशेती क्षेत्रBhaskar Jadhavभास्कर जाधवChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे