शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनीच वाजविली घंटा

By admin | Updated: November 7, 2015 22:43 IST

शासनाला ‘झोपमोड’चा इशारा : बचाव कृती समितीचे आंदोलन

रत्नागिरी : शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणाच्या निषेधार्थ स्थापन करण्यात आलेल्या शिक्षण बचाव कृती समितीच्या येथील जिल्हा शाखेतर्फे शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘घंटानाद’ आंदोलन करण्यात आले. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेला आकृतिबंध, शिक्षक भरतीवर बंदी, संस्थाचालकांचे मूलभूत अधिकार काढून घेणे, शिक्षकांचा अशैक्षणिक कामांचा बोजा वाढविणे, महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था अस्थिर करणे, कला व क्रीडा शिक्षकांची पदे कमी करणे, असे अनेक निर्णय शासन घेत आहे. हे निर्णय शिक्षकांसाठी जाचक असल्याने शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटना एकवटल्या असून, शासनाविरोधात टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज पहिल्या टप्प्यातील ‘घंटानाद’ आंदोलन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात आले.यावेळी शिक्षण बचाव कृती समितीत सहभागी असलेल्या विविध संघटनांचे २०० शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षकांनी घंटानाद करत शासनाचा निषेध केला. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी आपल्या मागण्यांसदर्भात चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी समितीच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवू, असे सांगितले. या शिष्टमंडळात संस्था संघटनांचे अ‍ॅड. विलास पाटणे, श्रीराम भावे, एन. जे. पाटील, प्रमोद दळी, विजय पाटील, भारत घुले, शोभा तांबे, जिल्हाध्यक्ष एकनाथ मोरे, गजानन पाटणकर, शिक्षक भारतीचे धनाजी बेंद्रे, अनिल उरणकर, रघुनाथ आडिवरेकर, रामचंद्र केळकर, आदींचा समावेश होता. हे आंदोलन पाच टप्प्यांत होणार आहे. या आंदोलनाची दखल शासनाने न घेतल्यास दि. १४ रोजी झोपमोड आंदोलन करण्यात येणार असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)