शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

Ratnagiri: रायपाटण येथे वृद्ध महिलेचा घरातच संशयास्पद मृत्यू, अंगावरील दागिने गायब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 19:35 IST

घातपाताची शंका

राजापूर : तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे ७४ वर्षीय महिलेच्या आकस्मिक मृत्यूने परिसर हादरला आहे. घरात एकटीच राहणारी ही महिला बुधवारी मृतावस्थेत आढळली. त्यांचा देह काळा पडला हाेता तसेच अंगावरील दागिने गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने त्यांचा घातपात झाला आहे का, हे शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. वैशाली शांताराम शेटे, असे या मृत महिलेचे नाव आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी श्वान पथकासह, फॉरेन्सिकची टीम आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी पाचारण केले. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक महामुनी, लांजा-राजापूरचे पोलिस उपविभागीय अधिकारी सुरेश कदम यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली व तपासाबाबत मार्गदर्शन केले.वैशाली शांताराम शेटे रायपाटण टक्केवाडीमध्ये त्यांच्या घरी एकट्याच राहतात. त्यांना सोमवारी वाडीमधील ग्रामस्थांनी पहिले होते. त्या रात्रीपासून त्यांच्या घरातील लाईटही बंद होता. मंगळवारीही त्या दिसल्या नव्हत्या. त्यामुळे बुधवारी सकाळी वाडीतील एका महिलेने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला; पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर जोरात दरवाजा लोटला असता तो उघडला गेला आणि आत जावून पाहिले असता घरात वैशाली शेट्ये या मृतावस्थेत पडलेल्या होत्या. त्यांचा देह काळा पडला होता.ही माहिती समजताच आजूबाजूचे ग्रामस्थ तेथे जमले. लगतच असलेल्या रायपाटण पोलिस दूरक्षेत्राला माहिती दिली. काही वेळातच रायपाटण पोलिस दूरक्षेत्रचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. राजापूर पोलिस स्थानकाचे निरीक्षक अमित यादव, उपविभागीय अधिकारी सुरेश कदम तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही रायपाटणमध्ये दाखल झाले.

श्वानपथकाला अडचणीघटना गंभीर असल्याने लगेचच श्वानपथक, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे (फॉरेन्सिक) पथक घटनास्थळी बोलाविण्यात आले. मात्र, मृतदेह काहीसा सडलेल्या अवस्थेत असल्याने श्वान पथकालाही अडचणी आल्या.

चोरीसाठी घातपात?मृत वैशाली शेट्ये यांच्या गळ्यातील सोन्याची माळ आणि कानात रिंग गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने त्यांचा घातपात करण्यात आला आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत. सायंकाळी उशिरा मृतदेह विच्छेदनासाठी रायपाटण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Elderly Woman Found Dead, Jewelry Missing; Investigation Underway

Web Summary : A 74-year-old woman was found dead in Ratnagiri, with missing jewelry sparking suspicion of robbery and murder. Police are investigating, deploying forensic and canine units. The body was sent for post-mortem.