देवरुख : संगमेश्वर-पाटण घाटमार्ग संदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामाला सुरुवात करत असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उत्तर रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता यांनी संताेष येडगे यांना दिले आहे. या पत्रात जून २०२६ पर्यंत प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण जून २०२६ पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.येडगे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संगमेश्वर तालुक्यातील नायरी-निवळी-नेरदवाडी या भागातून सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या नायरी नवीन घाट रस्ता (प्रमुख जिल्हा मार्ग ४७ किलाेमीटर २१/००० ते २६/६००) या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंजूर आहे.या प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून मे. मोनार्क सर्व्हेअर अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स लि. पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सादर केलेल्या ‘पाहणी अहवाल’ व ‘संरेखन अहवाल’ नुसार उपलब्ध तीन पर्यायी मार्गापैकी एका निश्चित मार्गाची अभ्यासासाठी निवड करण्यात आली आहे.सद्य:स्थितीत या निश्चित केलेल्या मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आवश्यक असणारी तांत्रिक सर्वेक्षणे सुरू आहेत. तसेच, या घाटमार्गाच्या कामासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. सद्य:स्थितीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जागेवर संयुक्त क्षेत्रीय सर्वेक्षणचे काम दि. ९ मार्च २०२६ पासून सुरू करण्यात आलेले आहे. संपूर्ण सर्वेक्षणाचे काम साधारणतः १५ एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.सर्वेक्षणाचे काम हे पूर्ण झाल्यानंतर संबंधित सल्लागार संस्थेमार्फत अंतिम प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. प्रकल्प अहवाल साधारणतः जून २०२६ पर्यंत प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या कार्यालयाच्या स्तरावर आपल्या मागणीच्या अनुषंगाने आवश्यक ती सकारात्मक कार्यवाही करण्यात येत आहे, असे पत्रात म्हटले आहे.
उपाेषण स्थगितसंगमेश्वर-पाटण प्रस्तावित घाट रस्त्याच्या कामासाठी संतोष येडगे यांनी मंगळवार, १७ मार्च राेजी मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला हाेता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या पत्रानंतर त्यांनी उपोषण स्थगित केले आहे.
Web Summary : Survey work has started for the Sangameshwar-Patan Ghat road project. The Public Works Department aims to submit the project report by June 2026. A joint field survey with the Forest Department began on March 9, 2026, and is expected to be completed by April 15, 2026. Santosh Yedge has postponed his hunger strike after receiving assurance.
Web Summary : संगमेश्वर-पाटण घाट सड़क परियोजना के लिए सर्वेक्षण कार्य शुरू हो गया है। लोक निर्माण विभाग का लक्ष्य जून 2026 तक परियोजना रिपोर्ट जमा करना है। वन विभाग के साथ संयुक्त क्षेत्र सर्वेक्षण 9 मार्च, 2026 को शुरू हुआ और 15 अप्रैल, 2026 तक पूरा होने की उम्मीद है। संतोष येडगे ने आश्वासन मिलने के बाद अपनी भूख हड़ताल स्थगित कर दी है।