खेडमधील तरुणींची आत्महत्या प्रेमप्रकरणातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 15:42 IST2020-11-28T15:40:08+5:302020-11-28T15:42:11+5:30
suicide, khed, crimenews, police, ratnagirinews खेड तालुक्यातील आस्तान कातकरीवाडी येथील अल्पवयीन मुलींनी केलेली आत्महत्या प्रेमप्रकरणातून केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत भारती हिलम हिच्या घरातून मिळालेल्या प्रेमपत्रामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलेले आहे. या प्रकरणात मृत्यू पावलेली १२ वर्षीय साक्षी ही भारतीशी असलेल्या घट्ट मैत्रीची बळी ठरली आहे

खेडमधील तरुणींची आत्महत्या प्रेमप्रकरणातून
खेड : तालुक्यातील आस्तान कातकरीवाडी येथील अल्पवयीन मुलींनी केलेली आत्महत्या प्रेमप्रकरणातून केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत भारती हिलम हिच्या घरातून मिळालेल्या प्रेमपत्रामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आलेले आहे. या प्रकरणात मृत्यू पावलेली १२ वर्षीय साक्षी ही भारतीशी असलेल्या घट्ट मैत्रीची बळी ठरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नववीत शिकणारी भारती हिचे तिच्याच घराशेजारी राहणाऱ्या एका मुलावर तिचे प्रेम होते. गेली काही वर्षे ही दोघे लग्नाच्या आणाभाका घेत होते. त्याच्याशी लग्न करून आपला संसार फुलवायचा असे स्वप्न भारती पाहात होती. त्या मुलानेही तिला लग्नाचे वचन दिले होते. याबाबत दोघांच्या घरच्यांना काहीही माहिती नव्हती.
दहावीपर्यंत शिक्षण घेऊन मोलमजुरीस लागलेल्या त्या मुलाच्या घरच्यांनी मुलगी बघण्यास सुरुवात केली होती. हे भारतीला कळल्याने ती तणावाखाली होती. त्या मुलाच्या घरच्यांनी मांडवे कातकरीवाडी येथील एका मुलीशी लग्न नक्की केले. हे भारतीला कळताच ती ते सहनच करू शकली नाही आणि तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. अखेर बुधवारी (२५ नोव्हेंबर) सकाळी आई - वडील घरातून बाहेर जाताच तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
दोघींच्या शरीरात विष गेले कसे?
दोघांच्या शवाचे विच्छेदन कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. प्राथमिक तपासणीत त्यांच्या शरीरात विष गेल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ते विष नेमके कुठून आले? दोन्ही मुलींच्या ते एकाचवेळी शरीरात कसे गेले? साक्षीने आत्महत्या का केली, याचा शोध पोलीस घेत आहेत.
आम्ही घटनास्थळी पाहणी व पंचनाम्याचे काम पूर्ण केले आहे. मुलींच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, त्या मुलींच्या मृत्यूबाबत नातेवाईकांची कोणतीही तक्रार नाही. तरीही शवविच्छेदना तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर सारे काही स्पष्ट होईल.
- नजीब इनामदार,
पोलीस उपनिरीक्षक, खेड