दुर्दैवी! अचानक उलटी झाली अन् चिमुकलीने गमावला जीव, रत्नागिरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 12:27 IST2024-01-02T12:26:14+5:302024-01-02T12:27:10+5:30

खेळता-खेळता अचानक उलटी करून बेशुद्ध पडली

Sudden vomiting and toddler lost life, incident in Ratnagiri | दुर्दैवी! अचानक उलटी झाली अन् चिमुकलीने गमावला जीव, रत्नागिरीतील घटना

दुर्दैवी! अचानक उलटी झाली अन् चिमुकलीने गमावला जीव, रत्नागिरीतील घटना

रत्नागिरी : खेळता- खेळता अचानक उलटी करून बेशुद्ध पडलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शांतीनगर - रसाळवाडी (ता. रत्नागिरी) येथे रविवारी सायंकाळी घडली. रिया जगन्नाथ कुमार (वय, ४ रा. रसाळवाडी, शांतीनगर, रत्नागिरी) असे तिचे नाव आहे.

जगन्नाथ कुमार हे शांतीनगर येथील रसाळवाडी भाड्याने राहतात. रविवारी सायंकाळी त्यांच्या दाेन्ही मुली घराबाहेर खेळत हाेत्या. त्यांची आई घरात कपडे धुवत हाेती. खेळता- खेळता माेठी मुलगी रिया घरात आली आणि ती उलट्या करू लागली. त्यानंतर ती जमिनीवरच बेशुद्धावस्थेत पडली. मुलीला समाेर बेशुद्ध पडलेले पाहून तिची आई घाबरून गेली. त्यांनी शेजारी राहणारे सुयाेग रसाळ यांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर सुयाेग रसाळ यांच्या वाहनाने रियाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. तिला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, सायंकाळी ५:३० वाजता तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. रियाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, याबाबत शहर पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली आहे.

Web Title: Sudden vomiting and toddler lost life, incident in Ratnagiri