वैजी येथे जमीन वादातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:33 IST2021-08-26T04:33:50+5:302021-08-26T04:33:50+5:30

चिपळूण : जागेच्या वादातून वैजी उगवतवाडी येथे एक वृध्द हातात तलवार घेऊन घर बांधकामासाठी आलेल्या ठेकेदारासह सख्ख्या चुलत भावाला ...

Strike over land dispute at Vaiji | वैजी येथे जमीन वादातून मारहाण

वैजी येथे जमीन वादातून मारहाण

चिपळूण : जागेच्या वादातून वैजी उगवतवाडी येथे एक वृध्द हातात तलवार घेऊन घर बांधकामासाठी आलेल्या ठेकेदारासह सख्ख्या चुलत भावाला मारण्यासाठी अंगावर धावून गेल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी त्या वृध्दावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडील तलवार जप्त करण्यात आली आहे. रघुनाथ तुकाराम घाग (वय ७०, वैजी-उगवतवाडी ) असे गुन्हा दाखल झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

याबाबतची फिर्याद एकनाथ कृष्णा घाग (७४, बैनी उगवतवाडी) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ घाग व रघुनाथ घाग हे नात्याने सख्खे चुलत भाऊ आहेत. ते सामायिक घरात विभक्त पद्धतीने राहतात. त्याच्यामध्ये काही वर्षापासून जमीन - जागेवरुन वाद आहेत.

एकनाथ घाग यांनी त्यांच्या जुन्या घराच्या जागेवर बांधकाम करण्यासाठी ठेकेदार मुकुंद काणेकर, कामगार अविनाश पाकेकर, योगेश गांधी हे मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्यासुमारास बांधकाम करण्यासाठी आले होते. त्यावेळी रघुनाथ घाग यांनी बांधकाम थांबविण्याकरिता एकनाथ घाग व काणेकर यांना शिवीगाळ करत हातात तलवार घेऊन त्यांना मारण्यासाठी अंगावर धावून गेले. या घटनेनंतर एकनाथ घाग यांनी चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यानुसार बुधवारी रघुनाथ घाग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याच्याकडील तलवार पोलिसांनी जप्त केली आहे.

Web Title: Strike over land dispute at Vaiji