शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याच्या डोक्यात घातला दगड

By admin | Updated: September 28, 2014 23:58 IST

गंभीर जखमी : भगवती मंदिर परिसरातील घटना; चौघे पसार

रत्नागिरी : रस्त्यात मारुती कार मुद्दामहून उभी केली या गैरसमजातून तहसीलदारस्तरीय अधिकारी संदेश सुभाष आयरे (वय ३२, जेल रोड, रत्नागिरी) यांना चौघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर रस्त्यावरील दगड उचलून एकाने आयरे यांच्या डोक्यात घातला. या मारहाणीत आयरे हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश असून याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सायंकाळी ६च्या सुमारास भगवत मंदिराच्या पायथ्याशी ही घटना घडली. आयरे व त्यांची पत्नी नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने भगवती देवीचे दर्शन घेतले. ते मारुती स्विफ्ट गाडी (एम एच. ११ एडब्ल्यू ५९७६) घेऊन निघाले होते. याचवेळी गाडीजवळ असलेल्या दुचाकीवरील पती-पत्नीचा गैरसमज झाला. या पती-पत्नींनी भांडण करीत आयरे यांना मारहाण केली. यावेळी मारहाण करणाऱ्या पती-पत्नीच्या ओळखीचे आणखी दोघे तिथे आले व या चौघांनी मिळून आयरे यांना पुन्हा मारहाण केली. त्यातील एकाने रस्त्यावरील मोठा दगड उचलून आयरे यांच्या डोक्यात मारला. या मारहाणीत आयरे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर चौघेही हल्लेखोर पसार झाले. मारहाण करणाऱ्यांच्या दुचाकीचा नंबर (एम.एच. ०८-यू-००७) असा आहे. जखमी झालेल्या संदेश आयरे यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयरे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद करण्यात आला.