शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला देशपातळीवरील पुरस्कार

By admin | Updated: November 20, 2015 00:07 IST

ऊर्जा परिषदेत गौरव : ग्रीन ग्रीडसह बेस्ट स्टेट पॉवरने दिल्ली येथील कार्यक्रमात सन्मानित

रत्नागिरी : दिल्ली येथे आयोजित नवव्या भारतीय ऊर्जा परिषदेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला पहिला क्रमांकाचा ग्रीन ग्रीड पुरस्कार तर द्वितीय क्रमांकाच्या बेस्ट स्टेट पॉवर युटीलिटी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या सहकार्याने आणि इंडिया चेंबर्स आॅफ कॉमर्सच्या वतीने ऊर्जा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये केंद्रीय विद्युत प्राधिकरण अध्यक्ष मेजर सिंग, माजी अध्यक्ष एच. एल. बजाज, ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अनिल राजदान व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महावितरणचे संचालक अभिजीत देशपांडे, वीज खरेदी विभागाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे, कार्यकारी अभियंता जितेंद्र फुले, मकरंद कुलकर्णी यांनी हे पुरस्कार स्वीकारले.महाराष्ट्रात महावितरणने विजेच्या मागणीचे व्यवस्थापन करण्यात लक्षणीय यश मिळवले आहे. सिंंगल फेजिंंग आणि गावठाण फिडर सेप्रेशन यामुळे सुमारे ५००० मेगावॅट विजेच्या मागणीचे व्यवस्थापन करणे शक्य झाले आहे. तसेच ऊर्जा बचतीसाठी एल. ई. डी बल्बच्या वाटपासह विविध अभिनव उपक्रम महावितरणने यशस्वीपणे राबविले आहेत. त्यामुळे महावितरणला ग्रीन ग्रीड या प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने परिषदेमध्ये गौरविण्यात आले.त्याचबरोबर महावितरणतर्फे ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यात ग्राहकांसाठी सुविधा केंद्र, तक्रार निवारणासाठी २४ तास आॅनलाइन सुविधा, ग्राहकाभिमुख विविध अत्याधुनिक सेवा, वीजबिल भरण्यासाठी मोबाईल अ‍ॅपसह वेगवेगळे उपयुक्त पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय पायाभूत आराखड्याअंतर्गत मोठया प्रमाणात वीज वितरण प्रणालीची कामे झाली असल्याने महावितरणच्या ग्राहक सेवेचा दर्जादेखील उंचावला आहे. या सर्व बाबींची दखल घेत महावितरणला द्वितीय क्रमांकाचा बेस्ट स्टेट पॉवर युटीलिटी पुरस्कार प्रदान करण्यात आला.राज्य शासनाच्या भरीव सहकार्यामुळे भविष्यात ग्राहकांना आणखी वाजवी दरात वीज, कृषिपंपाना मोठ्या प्रमाणात वीजजोडणी व पायाभूत आराखड्याद्वारे वीज व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करण्याचा प्रयत्न महावितरणद्वारे केला जात असल्याचे संचालक अभिजीत देशपांडे यांनी हे पुरस्कार स्वीकाल्यानंतर सांगितले. (प्रतिनिधी)