शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय हस्तक्षेपाची साथ

By admin | Updated: September 8, 2015 22:12 IST

रत्नागिरी पालिका : दैनंदिन कामकाज ठप्प होण्याचे प्रकार

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कामात गेल्या काही काळापासून राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे कर्मचारी बेजार झाले आहेत. कामाच्या वेळेत काही पदाधिकाऱ्यांचा सततचा हस्तक्षेप, विविध कामांसाठी सातत्याने वेठीस धरण्याच्या प्रकारामुळे दैनंदिन कामकाज ठप्प होत आहे. त्यामुळेच दैनंदिन काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ७ वाजेपर्यंत कार्यालयात थांबणे भाग पडत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक हे त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठीच मतदारांनी निवडून दिलेले आहेत. त्यामुळे हे नगरसेवक त्यांच्या प्रभागातील विकासकामांचा पाठपुरावा करीत असतात. त्यात काहीही गैर नाही. परंतु त्यातील काहीजण हे कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामांसाठी सातत्याने वेठीस धरतात. त्यांच्याकडून ठराविक कामेच करून घेण्यासाठी राजकीय दबाव टाकला जातो. विशेष करून नियमबाह्य कामांसाठीही त्यांना वेठीस धरले जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.दिवसभर अन्य कामात जुंपल्याने दैनंदिन कामकाज करणे अनेक कर्मचाऱ्यांना कठीण होत आहे. परिणामी ६ वाजेपर्यंत कामकाजाची वेळ असतानाही अनेक कर्मचाऱ्यांना त्यांचे कागदोपत्री काम पूर्ण करण्यासाठी सायंकाळी ७ वाजेपर्यंत थांबून काम पूर्ण करणे भाग पडत आहे.विकासाच्या कामांसाठी नगरसेवकांनी पालिकेत येणे, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटणे, त्यांच्याकडे विविध कामांसाठी पाठपुरावा करणे या गोष्टी कर्मचारी कधीही अमान्य करीत नाहीत. तो कामाचाच भाग आहे. परंतु हा पाठपुरावा जेव्हा काही नगरसेवक दिवसभर करतात, त्यावेळी मात्र कर्मचाऱ्यांना त्यांच्या हातातील दैनंदिन काम करणे अशक्य होते. तसेच काहीवेळा ठाण मांडून बसण्याच्या प्रकारामुळे काही प्रकरणे तपासून ती कागदपत्र मार्गी लावणे शक्य होत नाही. अशी कागदपत्र तपासण्याचा प्रयत्न केल्यास त्यात हस्तक्षेप केला जातो. त्याचा नाहक त्रास कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अर्थातच काहीजणांच्या या दिवसभर ठाण मांडण्याच्या प्रकारांमुळे अन्य नगरसेवकही त्यात नाहक भरडले जात आहेत. (प्रतिनिधी)नगरसेवकांमध्येही अस्वस्थतापदाधिकाऱ्यांनी करावे कामाचे नियोजनशहर विकासासाठी सर्वच प्रभाग हे महत्त्वाचे असून, समतोल विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी सामान्यत: दुपारच्या वेळेपर्र्यंत त्यांच्या प्रभागांबाबतची संबंधित कामे पूर्ण होतील, असे नियोजन केल्यास दुपारनंतरच्या वेळेत कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज पूर्ण करणे शक्य होईल व सायंकाळी उशिरापर्यंत थांबण्याचे दुष्टचक्र संपेल, अशीही चर्चा आहे.अन्य नगरसेवकही त्रस्तकाही नगरसेवक हे आक्रमक भूमिका घेत आपल्याच प्रभागात कामगारांनी काम करण्याचा हट्ट धरतात. त्यामुळे अन्य प्रभागातील कामावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. काही ठराविकच भागातील कामांसाठी पालिका आहे काय, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे, तर सफाई, कचरा, गवत काढणी यांसारखी कामे वेळेत न होणाऱ्या प्रभागातील नगरसेवकांना तेथील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. कामचुुकारांनाही हवी शिस्त...पालिकेतील काही विभागातील कर्मचारी हे कामचुकारपणा करण्यातही माहीर असल्याचे दिसून येत आहे. कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेत बसवण्यात आलेल्या सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांमुळे अनेकांचा कामचुकारपणाही प्रशासनाच्या लक्षात आला आहे. त्यामुळेच अशा काही कर्मचाऱ्यांना अन्य विभागात हलवण्यात आले आहे. हेतूबाबत संशय नको...पालिकेतील काही महत्त्वाच्या विभागात कामाच्या फाईल्स तशाच पडून असतात. काही महत्त्वाच्या फाईल्स गहाळ होण्याचे प्रकारही घडतात, तर काही कागदपत्रांची पूर्तता होण्यात विलंब होतो. त्यामुळे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या हेतूबाबत संशयही निर्माण होत असून, कोणतेही कागदपत्रविषयक काम किती दिवसांनी होणार, याची नागरिकांना स्पष्ट कल्पना देणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांना पालिकेचे उंबरठे सतत झिजवावे लागणार नाहीत, याचीही दक्षता घेतली जावी, अशी नागरिकांची मागणी आहे.