शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. प्रशासनाचा फुकट्यांना दणका

By admin | Updated: May 22, 2015 00:15 IST

कडक कारवाई : पंचेचाळीस हजाराचा दंड वसूल

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस. टी. वाडी-वस्तीवर पोहोचली असल्याने तिला जीवनवाहिनी असे संबोधण्यात येत आहे. प्रवास करताना वाहकाची नजर चुकवून प्रवास करणारे फुकटे प्रवासी अनेकवेळा तिकिट तपासनिसांच्या सापळ्यात सापडतात. वर्षभरात रत्नागिरी विभागात ११४ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून ४५ हजार ६८२ रुपयांच्या दंडासह तिकिटाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागांतर्गत नऊ आगार असून, सातत्याने संपूर्ण विभागांतर्गत तिकीट तपासणी मोहिम राबवण्यात येते. राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा रत्नागिरी विभागामध्ये फुकट प्रवाशांचे प्रमाण कमी आहे. परंतु दरमहा ही मोहीम राबवून फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येते. जिल्ह्यात तिकीट तपासनीस अनेकवेळा एखाद्या ठिकाणी मध्येच एस. टी.मध्ये चढून तिकीटांची तपासणी करतात. एस. टी.ने ही धडक मोहीम सुरू ठेवली आहे.तिकिटाची रक्कम ५० रुपये असेल तर १०० रुपये दंड व तिकिटाची रक्कम तिकीट न काढणाऱ्या व्यक्तीकडून वसूल केली जाते. त्याचबरोबर ५१ रुपयांच्या पुढे तिकीट असेल तर मात्र दंडाची रक्कम १०० रुपयांच्या दुप्पट होते. तसेच दंड रकमेसह तिकिटाची रक्कमही वसूल करण्यात येते.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या कमी झालेली दिसून येत आहे. गेल्या महिन्यात चार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करुन ३४९६ रुपये वसूल करण्यात आले आहेत. दंड आकारताना प्रवाशाने चुकवलेल्या भाड्याव्यतिरिक्त त्या भाड्याची दुप्पट आणि शंभर रुपये यापैकी जी रक्कम जास्त असेल, ती दंड म्हणून आकारण्यात येते. (प्रतिनिधी)