रत्नागिरी आगारातील एसटीच्या सहायक वाहतूक अधीक्षकांना मारहाण, तरुणाविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2025 18:05 IST2025-08-27T18:04:50+5:302025-08-27T18:05:09+5:30

तुला सोडणार नाही, तुला बघून घेईन, तुला ठार मारीन,’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली

ST Assistant Traffic Superintendent beaten up at Ratnagiri depot, case registered against youth | रत्नागिरी आगारातील एसटीच्या सहायक वाहतूक अधीक्षकांना मारहाण, तरुणाविरोधात गुन्हा दाखल 

रत्नागिरी आगारातील एसटीच्या सहायक वाहतूक अधीक्षकांना मारहाण, तरुणाविरोधात गुन्हा दाखल 

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या रत्नागिरी आगारातील सहायक वाहतूक अधीक्षकाला अज्ञात कारणातून मारहाण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार साेमवारी घडला. याप्रकरणी तरुणाविरोधात शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखिल चंद्रशेखर नार्वेकर (वय ३६, रा. गोळपसडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात प्रद्युम्न दत्तात्रय शिरधनकर (वय ५६, रा. पांडवनगर-नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, सोमवारी दुपारी ते रत्नागिरीतील मध्यवर्ती बसस्थानकात रजिस्टर लिहिण्याचे काम करत होते. त्यावेळी निखिल नार्वेकर याने त्या ठिकाणी येऊन अज्ञात कारणातून शिरधनकर यांना ‘तुला माज आला आहे. तुला सोडणार नाही, तुला बघून घेईन, तुला ठार मारीन,’ अशी धमकी देऊन शिवीगाळ केली.

त्यानंतर त्यांची मान टेबलवर दाबून मानेवर व पाठीवर हातांच्या ठोशाने मारहाण केली. या मारहाणीत शिरधनकर यांचे शर्ट फाटल असून, त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून तोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

Web Title: ST Assistant Traffic Superintendent beaten up at Ratnagiri depot, case registered against youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.