रत्नागिरीत मनसेमध्ये फूट; भाजप, शिंदेसेनेत कार्यकर्त्यांनी केला प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 18:05 IST2024-12-28T18:04:08+5:302024-12-28T18:05:28+5:30

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत सुरू असलेल्या धुसफुसीला कंटाळून रत्नागिरीतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षाला साेडचिठ्ठी देऊन अन्य पक्षात ...

Split in MNS in Ratnagiri; Workers join BJP, Shinde Sena | रत्नागिरीत मनसेमध्ये फूट; भाजप, शिंदेसेनेत कार्यकर्त्यांनी केला प्रवेश 

रत्नागिरीत मनसेमध्ये फूट; भाजप, शिंदेसेनेत कार्यकर्त्यांनी केला प्रवेश 

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत सुरू असलेल्या धुसफुसीला कंटाळून रत्नागिरीतीलमनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षाला साेडचिठ्ठी देऊन अन्य पक्षात जाण्याचा पर्याय स्वीकारला आहे. काही पदाधिकाऱ्यांनी भाजपची वाट धरली आहे तर काहींनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातील मनसेत फूट पडल्याचे समाेर आले आहे.

मनसेचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत, उपशहर अध्यक्ष जितेंद्र जाधव, माजी शहराध्यक्ष सतीश राणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाेबत सारिका शर्मा, माधवी गुरव, स्मिता गावडे, मोहिनी झगडे, नीलम जाधव, राजश्री सावंत, शीतल राणे, सोनाली केसरकर आदींसह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

भाजपच्या सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमात हा पक्षप्रवेश पार पडला. आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, दादा दळी, माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

त्याचबराेबर उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेचे अनिरुद्ध उर्फ छोटू खामकर, अजिंक्य केसरकर, अनिल पारकर, मिलिंद पाटील, साहिल वीर, अनंत शिंदे, सौरभ गायकवाड, सुनील पारकर, अमोल साळवी, संजय आग्रे, ओंकार सीनकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी उद्याेजक दीपक पवार, शहरप्रमुख बिपीन बंदरकर उपस्थित हाेते.

Web Title: Split in MNS in Ratnagiri; Workers join BJP, Shinde Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.