सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST2021-08-21T04:36:37+5:302021-08-21T04:36:37+5:30
डोस वाढविण्याची मागणी देवरुख : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु असले तरी डोस कमी उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त ...

सामाजिक बांधिलकी
डोस वाढविण्याची मागणी
देवरुख : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु असले तरी डोस कमी उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. लसीकरण तातडीने पूर्ण करण्यासाठी डोस उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासाठी संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती जया माने यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेऊन लसीची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे.
जल फाऊंडेशनकडून मदत
खेड : जल फाऊंडेशनतर्फे तालुक्यातील कांदोशी सुतारवाडी, धनगरवाडी, बिरमणी, कोळेवाडी, कातकरवाडी, आंबवली, सणघर, हेदली येथील कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. जल फाऊंडेशन कोकण विभागातर्फे हे साहित्य वाटप आयोजित करण्यात आले होते.
सावंत यांची निवड
खेड : येथील दिव्यांग खेळाडू प्रशांत सावंत यांची दि. २४ ते २६ ऑगस्ट रोजी मालदीव येथे होणाऱ्या दिव्यांग खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. सावंत यांनी गेली १० वर्ष राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत विविध पारितोषिके पटकावली आहेत.
प्रश्नमंजुषा स्पर्धा
दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सिनीयर सायन्स कॉलेजमध्ये ग्रंथालयात ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाविद्यालयाच्या आयक्यूएससी विभागाचे समन्वयक डॉ. रघुनाथ घालमे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
उत्स्फूर्त प्रतिसाद
खेड : गझल मंथन साहित्य संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय महागजल महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात ३०० गझलकार सहभागी झाले होते. नितीन देशमुख (अमरावती) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपद भूषण काटकर (पुणे) यांनी भूषविले.
झाडे कोसळली
रत्नागिरी : गणेशगुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या मार्गावर झाडे पडल्याने पर्यटकांना वाहने किनाऱ्यापर्यंत नेता येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ही पडलेली झाडे तोडून रस्ता मोकळा करण्याची मागणी ग्रामस्थांमधून व पर्यटकांतून होत आहे. कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यामुळे पर्यटकांचे आगमन सुरु झाले आहे.