शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळी बुद्रुक येथे सहा फ्लॅट फोडले

By admin | Updated: June 15, 2014 00:35 IST

आठ तोळ्याचे दागिने लंपास : महापारेषण कर्मचारी वसाहतीमधील घटना

शिरगाव : चिपळूण-कऱ्हाड हमरस्त्यालगत व संपूर्ण सुरक्षेची चोख व्यवस्था असतानाही अज्ञात चोरट्यांनी पिंपळी बुद्रुक येथे काल, शुक्रवारी मध्यरात्री सहा फ्लॅट फोडले. त्यापैकी एका फ्लॅटमधून ७२ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.न्यू कोयना महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित ४०० केव्ही ग्रहण केंद्राच्या या वसाहतीमधील नंदकुमार सुतार यांच्या घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरटे घरात घुसले. लोखंडी कपाट उचकटून त्यातील सुमारे ७२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. त्यावेळी सुतार सातारा येथील आपल्या घरी गेले होते. आज, शनिवारी सकाळी त्यांच्या मित्राने सुतार यांना दूरध्वनीवरून दरवाजा उघडला असल्याबाबत कळविल्यानंतर ते पिंपळी येथे तातडीने दाखल झाले. या घटनेनंतर तत्काळ संपूर्ण वसाहतीमध्येही पाहणी केली असता यावेळी आणखी सहा प्लॅट फोडल्याचे निदर्शनास आले. मात्र, शिरगाव पोलीस ठाण्यात केवळ सुतार यांनीच तक्रार दाखल केली आहे.चोरीचे वृत्त समजताच येथील पोलीस उपविभागीय अधिकारी दीपाली काळे, शिरगावचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगौले, चिपळूणचे उत्तम जगदाळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी डॉग स्कॉड आणण्याचे ठरले. मात्र, कालांतराने हा निर्णय रद्द करण्यात आल्याचे समजले. याच वसाहतीचे व कार्यालयाचे कार्यकारी अभियंता ए. एस. आडके यांनीही भेट देऊन पोलिसांना सर्व ती माहिती दिली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक चौरे अधिक तपास करीत आहेत. काल रात्री जे सुरक्षारक्षक येथे कार्यरत होते, त्यांच्याकडे पोलीस विचारपूस करीत आहेत. (वार्ताहर)