शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिपाईच करताहेत रुग्णसेवा

By admin | Updated: January 29, 2015 00:13 IST

अजब प्रकार : ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे अतोनात हाल

देव्हारे : मंडणगड येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये रात्री डॉक्टर उपलब्ध नसल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांमधे मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे.मंडणगड तालुक्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा हा एक मासलेवाईक नमुना आहे. तालुक्याच्या ठिकाणीअसलेल्या ग्रामीण रूग्णालयांमध्ये रात्री डॉक्टर व नर्स सेवेमध्ये उपलब्ध नसल्याचे दिसून येते. त्यामुळे येथे दाखल असलेल्या रूग्णांवर सेवेमध्ये असलेल्या शिपायांना रूग्णांची सेवा करावी लागते. रूग्णांना सलाईन लावण्याचे कामही त्यांना करावे लागत असल्याचा प्रकार मंडणगड ग्रामीण रूग्णालयामध्ये उघड होत आहे. या ठिकाणी रात्र पाळीसाठी एक डॉक्टर व एक नर्स यांची नियुक्ती असते. मात्र, हे दोघेही रात्री रूग्णांना तपासण्यासाठी किंवा त्यांच्या देखरेखीसाठी उपलब्ध नसल्याचे पाहावयास मिळत आहे.रात्रीच्या वेळी एखादा रुग्ण भरती असेल, त्याच्या आजारामधे फरक पडत नसेल, तर त्या रुग्णाला आपले दुखणे सहन करावे लागते. रात्रभर येथे रूग्णांच्या सेवेसाठी राहण्यास आम्ही बांधील नाही, असा परोपकारी सल्ला येथील डॉक्टर रूग्णांच्या नातलगांना देत असल्याचे सध्यातरी निदर्शनास येत आहे. डॉक्टर किंवा नर्स रात्री उपलब्ध नसल्याने, रूग्णालयामधे भरती असलेल्या दहा - बारा रूग्णांची सलाईन बदलण्यासारखी कामे सेवेमध्ये असलेल्या शिपायांना करावी लागतात़ त्यामुळे एखाद्या वेळेस चुकीचा उपचार होण्याचा धोका अधिक आहे़ डॉक्टरांना सेवेबाबत विचारण केली असता, आम्हालाही कुटुंब आहे. आम्ही येथे रात्रभर राहू शकत नाही, अशी गोंडस कारणे वैद्यकीय अधिकारी रूग्णांच्या नातलगांना देत असतात. मंडणगड रूग्णालयामध्ये हा प्रकार गेली अनेक वर्ष सुरू असल्याचे ऐकावयास मिळत आहे. या ठिकाणी रात्रीसाठी डॉक्टरांची नियुक्ती आहे. मात्र, रूग्णांच्या केसपेपरवर औषधांची माहिती लिहून झाल्यावर, ती औषधे देण्यासाठी डॉक्टर किंवा नर्स नसल्याने शिपाई आपले कर्तव्य समजून रूग्णांची सेवा करत असल्याचे पाहावयास मिळत आहे. या सर्व गोष्टींमळे रूग्णांची परवड होत आहे.या सर्व बाबींचा विचार करता, येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक रूग्णाला समाधानकारक सेवा मिळावी. तसेच रात्रीसाठी डॉक्टर व नर्स सेवेत उपलब्ध असावेत, अशी मागणी परिसरातील रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)रुग्णांचा सवाल...रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉक्टरांची पुरेशी संख्या नसल्याची ओरड तेथील डॉक्टर्सकडून करण्यात येत आहे. याबाबत वारंवार प्रयत्न करूनही याठिकाणी रिक्त पदे भरण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. गोरगरीब रुग्णांसाठी शासकीय रुग्णालये वरदान ठरत आहेत. मात्र, संबंधित रुग्णालयातील रिक्तपदांमुळे येथील सेवा विस्कळीत झाली असल्याचा कारभार पाहायला मिळत आहे. रुग्णालयातील रिक्त पदे भरल्यास अशी वेळ येणार नसल्याचे म्हटले जात आहे.