विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचा मार्ग दाखवा : संजय शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST2021-07-18T04:22:32+5:302021-07-18T04:22:32+5:30

अडरे : चिपळूण तालुक्यातील चिवेली गावाला नैसर्गिक संपदा भरभरून लाभली आहे. त्यामुळे येथील संस्थेने विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना स्वावलंबी कसे ...

Show students the way to business education: Sanjay Shirke | विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचा मार्ग दाखवा : संजय शिर्के

विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचा मार्ग दाखवा : संजय शिर्के

अडरे : चिपळूण तालुक्यातील चिवेली गावाला नैसर्गिक संपदा भरभरून लाभली आहे. त्यामुळे येथील संस्थेने विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना स्वावलंबी कसे बनता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी व्यवसायावर आधारित शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग लवकर सापडेल, असे प्रतिपादन रिगल कॉलेजचे संस्थापक संजय शिर्के यांनी चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ संस्थेच्या सभेत केले.

चिवेली आदर्श विद्यामंदिर येथे संस्थेने शैक्षणिक मार्गदर्शनपर संस्था आणि स्कूल कमिटीची सभा आयोजित केली होती. या सभेत संजय शिर्के बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रमेश शिर्के होते तर सल्लागार रघुनाथ शिर्के, संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र वणे, कार्यवाह मंगेश शिर्के, अंबरनाथ येथील नगरसेवक राजेश शिर्के, स्कूल कमिटी चेअरमन यशवंत शिर्के आणि मुख्याध्यापक संजय चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष संतोष कुळे, उपाध्यक्ष मोहन शिर्के, कोषाध्यक्ष वैभव शिर्के, विजय शिर्के, रवींद्र शिर्के, विक्रम कानसे, सुरेश बंगाल, बामणोली येथील दीपक पागडे, तुकाराम वणे, संजय तांबिटकर, राकेश वणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि स्कूल कमिटीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजय चव्हाण, मंगेश शिर्के यांनी केले तर संतोष कुळे यांनी आभार मानले.

170721\img-20210713-wa0015.jpg

विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाचा मार्ग दाखवा

रिगलचे संस्थापक संजय शिर्के यांचे चिवेलीत आवाहन

Web Title: Show students the way to business education: Sanjay Shirke