शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीजदराचा ग्राहकांना शॉक

By admin | Updated: December 26, 2014 23:46 IST

महावितरण कंपनी : अचानक दरवाढीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम

चिपळूण : ऐन हिवाळ्यात कमालीची थंडी पडत असताना आलेल्या वीज बिलामुळे अनेकांना शॉक बसला आहे. वीजबिलाची रक्कम अव्वाच्यासव्वा वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, काही लोक बिल दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयावर धडकत आहेत. राज्य शासनाने निवडणुकीनंतर वीजबिलावर ग्राहकांना देण्यात येणारी सबसिडी रद्द केल्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून वीजबिले वाढली आहेत. चालू वर्षात जी वीजबिले ग्राहकांच्या हाती पडली आहेत. त्यामध्ये अतिरिक्त आकाराच्या नावाखाली १०० ते १५० रुपये वाढ झाली आहे. शिवाय अंतरिम आकार, जेनको आकार, ट्रान्सको आकार या विविध नावाखाली ग्राहकांना महावितरणने झटका दिला आहे. वीजबिल वाढल्यामुळे ग्राहक हैराण झाले असून, महावितरणच्या कार्यालयावर वीजबिल कमी करुन घेण्यासाठी धावत आहेत. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे रिंडिंग जास्त असूनही वीजबिल कमी आहे व डिसेंबर महिन्यात रिडिंग कमी असूनही बिल जास्त आहे. त्यामुळे अधिकारी व ग्राहक यांच्यामध्ये नाहक वाद निर्माण होत आहे. वीजबिल भरणा केंद्रावर व एटीपी मशिनद्वारे वीजबिल भरले जात असून, ग्राहकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सबसिडी द्यावी व वीजबिले कमी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)