शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेने दापोली मतदारसंघातील उमेदवार बदलावा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 13:07 IST

मंडणगड : भाजपा महायुतीतील सर्वच घटक पक्ष व महायुतीचा सन्मान करते; परंतु लोकसभेच्या निवडणुकीतील दापोली मतदारसंघातील साडेआठ हजार मतांची ...

मंडणगड : भाजपा महायुतीतील सर्वच घटक पक्ष व महायुतीचा सन्मान करते; परंतु लोकसभेच्या निवडणुकीतील दापोली मतदारसंघातील साडेआठ हजार मतांची पिछाडी ही विधानसभेकरिता जागा धोक्यात असल्याचे संकेत देते. त्यामुळे शिंदेसेनेने विधानसभेचा आपला उमेदवार बदलावा, याकरिता भाजपा आग्रही असल्याचे व तसे न झाल्यास त्याचा फटका महायुतीस निवडणुकीत बसेल, असे प्रतिपादन भाजपाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी मंडणगड येथे केले.भाजपातर्फे गुरुवारी खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलते होते. या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील पाटील, तालुकाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.केदार साठे पुढे म्हणाले की, महायुतीतील शिंदेसेना हा मित्रपक्ष भाजपा कार्यकर्त्यांचा नेहमीच दुस्वास करत आहे. कोकणचे नेते रामदास कदम येऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपा शितासाठीही शिल्लक न ठेवण्याच्या वल्गना करत आहेत. त्यामुळे आमदार योगेश कदम यांनी भाजपासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले. आम्ही त्यांचा मनमानी कारभार व चुकांवर खुल्या दिलाने टीका केली आहे; पण पक्ष व आमच्या नेत्यांचा अवमान पक्षाचे स्वाभिमानी कार्यकर्ते कधीही सहन करणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, प्रकाश शिगवण, स्मिता जावकर, भाऊ इदाते यांनीही मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांनी प्रस्ताविक केले, सूत्रसंचालन विश्वदास लोखंडे यांनी केले.

रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्तेआम्ही पगारी नव्हे तर सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते आहोत. आमच्या पक्षाचा विस्तार करण्याचा आम्हाला अधिकार आहे. मतदारसंघात आम्ही लोकहिताची कामे करणार नाही व दुसऱ्यांनी केली तर आम्ही करून देणार नाही, ही नीती सोडा, असे आवाहन केदार साठे यांनी केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीBJPभाजपाShiv Senaशिवसेना