शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ निर्दोष, तरीही वनवास!

By admin | Updated: October 22, 2015 00:50 IST

व्यसनाच्या आहारी गेलेल्या पतीची मुलानेच हत्या केली. एक मुलगा आधीच बेपत्ता झालेला.

नात्यांची अशीही शिक्षा : कुंकू पुसले, मुलगा तुरूंगातअमरावती : व्यसनाच्या आहारी गेलेल्या पतीची मुलानेच हत्या केली. एक मुलगा आधीच बेपत्ता झालेला. दुसराही आता तुरूंगात. ‘ती’ निर्दोष असतानाही तिच्या नशिबी असा वनवास आला आहे. नात्यांनी दिलेली शिक्षा आता तिला आयुष्यभर मुक्यानेच भोगावी लागणार आहे. वडाळीतील प्रबुध्दनगरात मंगळवारी वडिलांची मुलाने हत्या केल्यानंतर प्राक्तनाचे भोग पाहून विलाप करणाऱ्या निर्दोष बेबीतार्इंची अवस्था बघवली जात नाही.महादेव व बेबी उघडे या दाम्पत्याने हलाखीच्या स्थितीत विनोद व प्रमोद या दोन मुलांचे संगोपन केले. महादेव यांनी सायकल दुरूस्तीचा दुरुस्तीचा व्यवसाय करून कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मात्र, नंतर ते व्यसनाधीन झाले आणि बेबीतार्इंच्या नशिबी दु:खाचे सत्र सुरू झाले. कशीबशी दोन्ही मुले लहानाची मोठी झाली. हळूहळू मुलगा विनोदही व्यसनाधीन झाला. दुर्देव कमी की काय म्हणून मध्यतंरी मोठा मुलगा प्रमोद घर सोडून निघून गेला. तो पुन्हा परतलाच नाही. परंतु नवरा आणि एका मुलाच्या बळावर बेबीताई जगत होत्या. दररोज पती दारू पिऊन बेबीतार्इंना शिवीगाळ करी. मात्र, मुलाला ही बाब सहन होत नव्हते. त्यामुळे वडिल व मुलांचे दररोज वाद व्हायचे. त्या वादात मध्यस्थी करून वाद मिटवायच्या. हे दररोजचेच झाले होते. घटनेच्या दिवशीही बाप-लेकांमध्ये असाच वाद झाला. मात्र, हा वाद शेवटचा व विनाशकारी ठरेल, असे बेबीतार्इंना वाटले नव्हते. आपण मध्यस्थी करून दोघांनाही शांत करू, असे त्यांना वाटले. पण, मुलाचा संताप आणि नवऱ्याचे व्यसन यामुळे होत्याचे नव्हते झाले. मुलाने बापाचा क्रूरपणे खून केला. डोळ्यांदेखत बेबीतार्इंचा कसाबसा सावरलेला संसार उध्वस्त झाला. मुलाच्या हाती हातकड्या आणि नवऱ्याचे रक्ताने माखलेले कलेवर पाहून त्या स्तंभित झाल्या आहेत. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आता त्यांना आयुष्यभर एकटीने भोगावी लागणार आहे. यापेक्षा दुर्देव ते काय असणार?