शाहूवाडीतील शिक्षकाचा अपघातात मृत्यू, साखरपा -देवरूख मार्गावर दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:45 IST2020-12-22T17:43:35+5:302020-12-22T17:45:28+5:30
accident Ratnagiri kolhapurnews- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा - देवरुख रस्त्यावरील साखरपा - मोर्डे येथील मार्गावर एस. टी. व अल्टो कार यांच्यात रविवारी सायंकाळी अपघात झाला. या अपघातात जखमी झालेले मूळचे शाहूवाडी येथील मात्र कोंडगाव येथे स्थायिक झालेले देवडे क्र. ४ शाळेचे शिक्षक संदीप दत्तात्रय कांबळे (४२) यांचे रत्नागिरी येथे नेतानाच निधन झाले.

शाहूवाडीतील शिक्षकाचा अपघातात मृत्यू, साखरपा -देवरूख मार्गावर दुर्घटना
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा - देवरुख रस्त्यावरील साखरपा - मोर्डे येथील मार्गावर एस. टी. व अल्टो कार यांच्यात रविवारी सायंकाळी अपघात झाला. या अपघातात जखमी झालेले मूळचे शाहूवाडी येथील मात्र कोंडगाव येथे स्थायिक झालेले देवडे क्र. ४ शाळेचे शिक्षक संदीप दत्तात्रय कांबळे (४२) यांचे रत्नागिरी येथे नेतानाच निधन झाले.
एस. टी. बस व कार यांच्यात समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला होता. यात चारजण गंभीर जखमी झाले होते. बसचालक तुकाराम माधव फोले (३८) हे देवरूख - साखरपा (एमएच ०९ एफएल १०८३) ही गाडी घेऊन जात होते. त्याचवेळी साखरप्याहून देवरुखकडे जात असताना संदीप दत्तात्रय कांबळे (४८, साखरपा) यांच्या अल्टो कारची (एमएच ०८, इ ६९३६) बसला समोरून जोराची धडक बसली.
या अपघातात संदीप दत्तात्रय कांबळे (४८), विजयमाला संदीप कांबळे (४२), शंकर कल्ला बोरडे (५७), सरस्वती शंकर बोले (४७) हे प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन त्वरित रत्नागिरी येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले.
मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच संदीप कांबळे यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान कोंडगाव येथील राहत्या घरी आणण्यात आला. त्यांचा मृतदेह कोंडगाव येथे आणून मूळ गावी शाहूवाडी येथे नेण्यात आला. तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.