शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राजांचा अपमान करा, सुरक्षा मिळवा; सरकारने नवी योजना सुरु केल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:39 IST

भाजपने शिवाजी महाराजांची समाधी १९८ वर्षे लपवून ठेवली

रत्नागिरी : भाजपने शिवाजी महाराजांची समाधी १९८ वर्षे लपवून ठेवली. कारण येणाऱ्या पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास समजू नये. आता हेच सरकार शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सुरक्षा पुरवीत आहेत. त्यामुळे राजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा, अशी नवी योजना या सरकारने सुरू केल्याचा आरोप काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी येथे केला. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.महायुतीच्या सरकारच्या हेक्याची किंमत सर्व समाजाला चुकवावी लागत आहे. त्यामध्ये शेतकरी, मजूर आहेत. बेरोजगारीचा प्रश्न, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, स्वारगेटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडू लागल्या आहेत. केंद्रीय मंत्र्याच्या कुटुंबातील लेकीही सुरक्षित नाहीत, १० लाख लाडक्या बहिणींना लाभापासून वंचित ठेवणे, अशा अनेक मुद्द्यावर भाजप सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोपही त्यांनी केला.हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळू नये यासाठी त्यांची समाधी तब्बल १९८ वर्षे लपवून ठेवली आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना सरकार सुरक्षा पुरवून त्यांना पाठिशी घालत आहे, असा आराेप त्यांनी केला.ते पुढे म्हणाले की, राज्यात कायदा व सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे. बीड जिल्ह्यात सरपंचाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यामागे काेण आका हाेता ते जनतेने पाहिले, आता आकानंतर खाेक्या आला आहे, असा आराेपही त्यांनी यावेळी केला. एक मंत्री खाेटी कागदपत्रे दिल्याप्रकरणी दाेषी ठरला आहे.तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री राेज बेताल वक्तव्य करुन राज्यातील शांतता व साैहार्दला छेद देत असल्याचा आराेप करुन त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला.

हे गँग ऑफ सरकारटोळ्या एकत्र येऊन राज्यातील हे महायुतीचे सरकार स्थापन झाल्याने मंत्र्यांमध्ये बेबनाव आहे. त्यामुळे गँग ऑफ वासेपूर चित्रपटाप्रमाणे हे गँग ऑफ सरकार, असा खेळ महाराष्ट्रात सुरू आहे. त्याची किंमत जनतेला मोजावी लागत असल्याचा आराेपही हर्षवर्धन सपकाळ यांनी केला

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcongressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळBJPभाजपाMahayutiमहायुती