शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

आराखड्यावर ओरखडे

By admin | Updated: October 12, 2015 00:37 IST

निव्वळ घोषणाबाजी : पर्यटन विकास कागदावरच!

रहिम दलाल- रत्नागिरी --रत्नागिरीच्या पर्यटन विकासाबाबत नेहमीच मोठमोठ्या योजना समोर ठेवल्या जात आहेत. आराखडाही आखण्यात आला आहे. मात्र, रत्नागिरीतील किनारपट्टीवर पर्यटनासाठी आवश्यक वातावरण असतानाही सुविधांचा पत्ता नाही. पर्यटकांना मोहिनी घालणारा भाट्येसारखा किनारा अंधारात आहे. त्यामुळे पर्यटन विकास की निव्वळ घोषणाबाजी, असा सवाल जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी राजकीय व शासन स्तरावर इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्यांच्या ते कधी लक्षात येईल, असा प्रश्न भाट्ये खाडीवरील पूल आणि त्याला लागूनच असलेल्या भाट्ये सुरुबन समोरील किनारपट्टीच्या रात्रीच्या भयाण स्थितीवरुन दिसून येते आहे.रत्नागिरी शहरात येणाऱ्या पर्यटकांची पावले प्रथम भाट्ये आणि मांडवी किनाऱ्याकडे वळतात. जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रत्नागिरी पर्यटन महोत्सवावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. भाट्ये किनाऱ्यावर आणि गो. जो. महाविद्यालयाच्या मैदानावर पर्यटकांसाठी हा महोत्सव भरविण्यात आला होता. हजारो लोकांनी या महोत्सवाला हजेरी लावली. मात्र, हा झगमगाट पर्यटकांना दाखवताना भाट्ये पूल आणि सुरुबन परिसरात पसरलेल्या अंधाराच्या साम्राज्याकडे अद्याप कोणाचेही लक्ष गेलेले नाही.भाट्ये पुलावर रात्रीच्या वेळी भयाण अंधार असतो. भाट्ये पुलावर पूर्वी विजेचा लखलखाट होता. त्यामुळे स्थानिक लोकही रात्रीच्या वेळी या शांत व निसर्गरम्य वातावरणामध्ये फेरफटका मारण्यासाठी येत असत. मात्र, समाजकंटकांनी या पुलावरील विजेचे दिवे फोडून टाकल्याने आज कित्येक वर्षे येथे अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याचबरोबर पुलाचा कठडाही तोडण्यात आलेला आहे. कधीकाळी बांधकाम विभागाकडून या पुलाला रंगरंगोटी केली केली. मात्र, महत्त्वाची समस्या असलेल्या विजेकडे कानाडोळा करण्यात आला. पर्यटन विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना, आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. मात्र, पर्यटन विकास महामंडळ कार्यालयाच्या काही अंतरावर असलेला भाट्ये पूल आणि परिसर अंधाराच्या साम्राज्यापासून कधी मुक्त होणार, याकडे लक्ष लागले आहे. पर्यटन विकासाला चालना दिल्यास येथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या भौतिक सोयीसुविधा शासनाने उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच भाट्ये पूल व परिसरात विद्युतीकरणाकडे शासनाने लक्ष द्यावे. मात्र तसे लक्ष दिले जात नाही.- फैज अहमद काद्री, राजिवडा.भाट्ये, मांडवी किनाऱ्यावर पर्यटन विकास केल्यास आणखी महत्व प्राप्त होईल. पर्यटन विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करताना तो आवश्यक असलेल्या ठिकाणी खर्च करावा. पर्यटनस्थळांचा विकास होऊन येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. भाट्ये पूल व परिसराच्या पर्यटन विकास करणे, गरजेचे आहे. - शेख महंमद हुश्ये,राजिवडा, रत्नागिरी.