शहरं
Join us  
Trending Stories
1
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
2
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
3
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
4
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
5
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
6
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
7
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
8
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
9
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
10
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
11
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
12
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
13
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
14
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
15
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
16
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
17
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
18
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
19
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर ST खोल खड्ड्यात कोसळली, २५ प्रवासी थोडक्यात बचावले
20
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई कृती आराखडा मंजूर

By admin | Updated: February 28, 2015 23:37 IST

जिल्हा परिषद : पाणीटंचाईसाठी यंदा पावणेदोन कोटी

रत्नागिरी : जिल्ह्याचा १९० गावातील ४९८ वाड्यांचा संभाव पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता. हा १ कोटी ७६ लाख रुपयांचा आराखडा जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. तो आराखडा शासनाने मंजूर केला आहे. मात्र, यंदाचा आराखडा गतवर्षीपेक्षा निम्मा आहे.
जिल्ह्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या दिवसांत भिषण पाणीटंचाई उद्भवते. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी कोट्यवधी रुपये शासनाकडून खर्च करण्यात येतात. या उन्हाळ्यातील टंचाईवर कायमची मात करण्यासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईवरील खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना यंदा मात्र पाणीटंचाई कमी जाणवेल, अशी जिल्हा परिषदेला आशा वाटत आहे. पाणीटंचाई आराखड्यातही यंदा खर्च कमी दाखवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
यावर्षीचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा १ कोटी ७६ लाख रुपयांचा आहे़ या आराखड्यातून विंधन विहिरींची कामे वगळण्यात आली आहेत़ कारण विंधन विहिरींच्या कामे डीपीडीसीमधून घेण्यात आलेली नाहीत.
या टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यातील १९० गावातील ४९८ वाड्यांमध्ये पाणीटंचाई भेडसावणार आहे़ त्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे-
टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठ्यासाठी १ कोटी ७६ लाख २० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे़ नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी १ कोटी १२ लाख ५० हजा रुपये, खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी ७० हजार रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे़ जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्याचा टंचाई कृती अराखडा जिल्हा प्रशासनाकडे जानेवारी, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर केला होता. तो १ कोटी ७६ लाख रुपयांचा आराखडा शासनाने मंजूर केला आहे. (शहर वार्ताहर)