शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: जमिनीच्या वादातून सरपंचांकडून सहायक व्यवस्थापकावर वार, दापोली तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 17:47 IST

दापोली : जमिनीच्या वादातून लाेढा कंपनीच्या सहायक व्यवस्थापकावर पाडले (ता. दापाेली) गावातील सरपंचांनी धारदार हत्यारांनी वार केल्याची घटना गुरुवारी ...

दापोली : जमिनीच्या वादातून लाेढा कंपनीच्या सहायक व्यवस्थापकावर पाडले (ता. दापाेली) गावातील सरपंचांनी धारदार हत्यारांनी वार केल्याची घटना गुरुवारी सकाळी इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रा.लि.च्या साईटवर घडली. या हल्ल्यात सुभाष राजेंद्र लाेणारी (३६) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर दापाेली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी सरपंच रवींद्र सातनाक यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सुभाष राजेंद्र लोणारी हे आंजर्ले पाडले गावच्या सीमेवरील शार्प स्किल इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रा.लि. या कंपनीच्या साईटवर लायझनिंग प्रमुख म्हणून काम पाहतात. या साईटचे काम सुरू असल्यापासून पाडले गावचे सरपंच रवींद्र सातनाक हे वरिष्ठ अधिकारी दीपेंद्र गुप्ता यांच्याकडून खंडणीच्या स्वरूपात पैसे घेत होते. दीपेंद्र गुप्ता यांची बदली झाल्याने दीड महिना त्यांचे कामही सुभाष लाेणारी पाहत आहेत.गुरुवारी सकाळी रवींद्र सातनाक यांनी साईटवर सुरू असलेल्या कामाबद्दल खंडणी स्वरूपात पैशांची मागणी केली. हे पैसे देण्यास सुभाष लाेणारी यांनी नकार दिला. त्यानंतर सातनाक यांनी धमकी देत चाकूने छातीवर व दंडावर वार केले. या हल्ल्यात सुभाष लोणारी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ दापाेली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.या घटनेची माहिती मिळताच दापाेलीचे पोलिस अधिकारी आर. बी. मोहिते यांनी रुग्णालयात जाऊन जबाब घेतला. या प्रकरणी दापाेली पाेलिसांनी सरपंच रवींद्र सातनाक यांच्यावर भारतीय दंड विधान कायदा कलम ३०७, ३८६, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास पाेलिस उपनिरीक्षक यादव करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsarpanchसरपंचCrime Newsगुन्हेगारीdapoli-acदापोली