शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘सॅफरॉन’चा १०० गुंतवणूकदारांना गंडा

By admin | Updated: June 23, 2014 01:41 IST

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार १०० गुंतवणूकदारांकडून ‘सॅफरॉन’ने २ कोटी ११ लाख १ हजार २७० रुपये रक्कम स्वीकारल्याचे उघड झाले.

रत्नागिरी : सॅफरॉन कंपनीने केलेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणी आज, रविवार सायंकाळपर्यंत शहर पोलिसांनी केलेल्या तपासानुसार १०० गुंतवणूकदारांकडून ‘सॅफरॉन’ने २ कोटी ११ लाख १ हजार २७० रुपये रक्कम स्वीकारल्याचे उघड झाले. दामदुप्पट योजनेंतर्गत या ग्राहकांना १० कोटी ६६ हजार रुपयांचे धनादेश कंपनीकडून दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. ही माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप मिसर यांनी दिली. सॅफरॉन इंटरनॅशनल हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने लोकांना पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुलुंड, मुंबईत मुख्य सूत्रधार शशिकांत राणे याला मुलुंड (मुंबई) पोलिसांनी अटक केली असून, त्याला २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे; तर रत्नागिरीत या प्रकरणी शहर पोलिसांनी ऐश्वर्या गावकर (उत्कर्षनगर, कुवारबाव) व रश्मी मांडवकर (नाचणे, रत्नागिरी) या सॅफरॉनच्या रत्नागिरी कार्यालयात त्यावेळी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या दोन महिलांना अटक केली असून, त्यांची पोलीस कोठडी उद्या, सोमवारी संपत आहे. सॅफरॉनकडून रत्नागिरीतील १५०० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असून, फसवणुकीची मुद्दलच २० कोटींपर्यंत असण्याची शक्यता आहे. शहर पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत या तपासाला अधिक गती दिली असून, दोन्ही महिला संशयित आरोपींच्या घरांची पोलिसांनी झडती घेतली. झडतीत गुंतवणूकदारांशी झालेल्या आर्थिक व्यवहारांची अनेक कागदपत्रे, बॅँक खाते पुस्तके तसेच धनादेश जप्त करण्यात आले आहेत. कंपनीने केलेल्या गुंतवणुकींची माहितीही मिळाली आहे. त्यामुळे आरोपींविरोधातील पुरावे अधिक भक्कम झाले आहेत. (प्रतिनिधी)