श्रीधर बापट यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:35 IST2021-08-20T04:35:09+5:302021-08-20T04:35:09+5:30

राजापूर : तालुक्यातील सोलगाव येथील डॉ. श्रीधर दत्तात्रय बापट यांना सातारा येथील जीवन सर्वोदय सामाजिक संस्थेतर्फे डॉ. पा. वा. ...

'Samajbhushan Award' announced to Shridhar Bapat | श्रीधर बापट यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

श्रीधर बापट यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ जाहीर

राजापूर : तालुक्यातील सोलगाव येथील डॉ. श्रीधर दत्तात्रय बापट यांना सातारा येथील जीवन सर्वोदय सामाजिक संस्थेतर्फे डॉ. पा. वा. सुखात्मे यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा ‘समाजभूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष जीवन इंगळे, रवींद्र इनामदार व मार्गदर्शक प्रा. विश्वास नेरकर यांनी ही माहिती दिली.

सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, ग्रंथ, एक झाड व पाच हजार रुपये मानधन असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. श्रीधर बापट हे वैद्यकीय सेवेबरोबरच आपल्या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा सोलगाव क्रमांक २ या शाळेच्या व्यवस्थापनाशी १९६७पासून जोडले गेले आहेत. विद्यमान शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आदर्श सोलगाव क्रमांक २ शाळेचे मुख्याध्यापक दीपक धामापूरकर, शिक्षक ज्ञानेश्वर मगदूम, पुष्पमाला नांगरेकर, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्यातर्फे डॉ. श्रीधर बापट यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

Web Title: 'Samajbhushan Award' announced to Shridhar Bapat