शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

करोडोंच्या जमिनींची कवडीमोलाने विक्री

By admin | Updated: August 27, 2015 23:36 IST

गणपतीपुळे परिसर : जमीन खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे चित्र

गणपतीपुळे : कोकणात पर्यटनाचे वारे वाहू लागल्यापासून कोकणातील समुद्रालगतच्या जमिनींबरोबरच ज्या गावात समुद्रच नाही, अशा गावातील जमिनीलासुद्धा चांगली किंमत येऊ लागली आहे. मुंबई, पुणेबरोबरच राज्याबाहेरील लोकांनीसुद्धा जमिनीत गुंतवणूक सुरु केल्याने गणपतीपुळेसारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाबरोबरच नजीकच्या गावांमधूनही जमिनींचे बिनशेती करणारे (विकासक) व्यवसायात उतरल्याचे दिसून येत आहे.रत्नागिरीपासूनच्या काही बड्या अधिकाऱ्यांनीही एजंटामार्फत येथील परिसरात गुंतवणूक केली आहे. मात्र, एंजटांना विकासक आणि गुंतवणूकदार यांच्याकडून पैसा मिळतो, त्या प्रमाणात स्थानिक शेतकऱ्यांना आपल्या जमिनींचा मोबदला मिळत नाही, याला कारणेही तशीच आहेत.येथील अनेक जागांचे नकाशे हे रत्नागिरी येथील भूमी अभिलेख कार्यालयात जीर्ण स्वरुपात असल्याचे सांगितले जाते. अनेक नकाशे हे गहाळ झाल्याने मिळत नाहीत. त्यामुळे अशिक्षित तसेच कागदपत्रांची माहिती नसलेल्या सुशिक्षित लोकांना भूमी अभिलेख कार्यालयात वारंवार खेपा मारुनही बऱ्याचदा परतच पाठवले जाते. या ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, अशी कारणेही सांगितली जातात. या कारणाने एखाद्या जागेचा नकाशा न मिळाल्यास संबंधित असलेली जागा मोजू किंवा शोधू शकत नसल्याने करोडो रुपये किमतीच्या जागेची किंमत शून्य होऊन जाते. अशावेळी सराईत असणारे गावातीलच एजंट तेथील तलाठ्यांना हाताशी धरुन तलाठी कार्यालयामध्ये असलेल्या जुन्या नकाशावरुन नवीन नकाशे बनवून घेतात आणि शेतकऱ्यांकडून कवडी मोलाने जागा विकत घेतात. संधी मिळताच बड्या पैसेवाल्याला जागांची विक्री करतात. याकामी काही तलाठीही एजंटचे काम करत असून, आपल्याकडील अनेक जुने नकाशे एजंटांशिवाय तसेच स्वत:ला मोठे कमिशन मिळाल्याशिवाय अन्य कोणालाही देत नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांची फसवणूक सुरु असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे समितीच्या व्यवहारांशी गुंतलेले काही शासकीय कर्मचारी व अधिकारी या भागातून आपली बदली होऊ नये म्हणून गावातील नेत्यांना हाताशी धरुन लोकांची निवेदने शासनाकडे पाठवतात. ग्रामसभेमध्ये तसा ठराव करुन घेण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला ही मंडळी तयार असतात.सर्व तलाठी कार्यालयांमधील जुने नकाशे भूमी अभिलेख कार्यालयात जमा करुन ते व्यवस्थितरित्या जतन केल्यास स्थानिक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक व लूट थांबवू शकते. पण याकडे लक्ष कोणी द्यायचे. (वार्ताहर)++काही बड्या अधिकाऱ्यांनीही एजंटांमार्फत येथील परिसरात केली गुंतवणूक.अनेक जागांचे नकाशे हे रत्नागिरी येथील भूमी अभिलेख कार्यालयात जीर्ण स्वरुपात.बहुतांश नकाशे गहाळ झाल्याने मिळत नाहीत.शेतकऱ्यांपुढे पेच.