शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपशाने भरली तिजोरी

By admin | Updated: October 21, 2015 23:52 IST

रत्नागिरी जिल्हा : एका महिन्यात ५९ लाखांचा महसूल

रत्नागिरी : जिल्ह्यातील हातपाटी उत्खननासाठी जिल्हा प्रशासनाकडून मागवण्यात आलेल्या १३४पैकी ९२ प्रस्तावांना मंजुरी देऊन त्यांना परवाने देण्यात आले होते. या एका महिन्याच्या कालावधीत परवानाधारकांनी १५ रेती गटांमध्ये केलेल्या वाळू उपशाच्या रॉयल्टीतून जिल्हा खनिकर्म विभागाच्या तिजोरीत सुमारे ५९ लाखाचा महसूल जमा झाला आहे. नदी, खाड्यांतील हातपाटी वाळू उत्खननासाठी परवाने देण्याचे अधिकार मेरिटाईम बोर्डाकडे देण्यात आले आहेत. मेरिटाईम बोर्डाकडून दापोली तालुक्यातील आंजर्ला खाडीतील तीन, दाभोळ खाडीतील एक, रत्नागिरी तालुक्यातील जयगड खाडीतील तीन आणि काळबादेवी खाडीतील एक अशा एकूण चार खाड्यांमधील ८ रेती गटांना हातपाटीसाठी ६००० ब्रासचा रेतीसाठा निर्धारित करून देण्यात आला होता. वाळू परवाने देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने हातपाटी वाळू व्यावसायिकांच्या व्यवसायावरील ग्रहण कित्येक वर्षांनंतर सुटले आहे.यासाठी केवळ एका महिन्याची मुदत असल्याने या कालावधीत आठ खाड्यांमधील १५ रेती गटांत वाळू उपसा करण्यात आला. यासाठी आकारण्यात आलेल्या रॉयल्टीपोटी जिल्हा खनिकर्म विभागाच्या तिजोरीत ५९ लाख २९ हजार रुपये इतका महसूल तिजोरीत जमा झाला आहे. मात्र, ही मुदत सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंतच होती. आॅक्टोबरमध्ये नव्याने प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. यासाठी मेरिटाईम बोर्डाकडून पुन्हा परवानगी मिळवावी लागणार आहे. त्यानंतर या व्यावसायिकांना परवाने मिळणार आहेत. या परवान्यांची मुदत एक वर्षाची असेल. मात्र, मेरिटाईम बोर्डाकडून वाळू उत्खननासाठीचा साठा अद्याप निर्धारित करण्यात आलेला नसल्याने सध्या हातपाटी वाळू व्यावसायिकांचे लक्ष याकडे लागले आहे. तसेच ड्रेझर वाळू उत्खननासाठीही लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ड्रेझर व्यावसायिकही परवानगीची प्रतीक्षा करीत आहेत. या वाळूउपशाला परवानगी मिळाली तर जिल्हा प्रशासनाच्या खनिकर्म विभागाचा गेली दोन वर्षे थांबलेला महसूल पुन्हा नियमित होणार आहे. (प्रतिनिधी)उत्खनन बंदी : ड्रेझरव्दारा उपशाला लवकरच परवानगी ?सध्या अनेक ठिकाणी वाळू उपशांना परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे रॉयल्टीमध्ये थोडीफार कमी झाली आहे. मात्र, उर्वरित ठिकाणी वाळू उपसा सुरु झाल्याने खनिकर्म विभागाच्या तिजोरीत रॉयल्टीपोटी ५९ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. सध्या वाळू उत्खननावर काही ठिकाणी बंदी असल्याने त्याचा परिणाम काही प्रमाणात बांधकाम व्यवसायावर झाला असला तरीही खनिकर्म विभागाची तिजोरी भरली आहे. लवकरच ड्रेझर वाळू उत्खननासाठीही परवानगी मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे हा महसूल वाढण्याची शक्यता आहे.दोन वर्षे थांबलागेली दोन वर्षे खनिकर्म विभागाचा महसूल थांबला आहे किंवा तो कमी आहे. ड्रेझरव्दारे वाळू उपशाला परवानगी मिळाली तर पुन्हा हा महसूल नियमित होऊ शकतो. ड्रेझर व्यावसायिकही या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.