शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एस. टी. कामगार संघटनेचे धरणे आंदोलन

By admin | Updated: October 15, 2015 00:45 IST

कणकवली कार्यशाळा : विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

कणकवली : एस. टी. कामगारांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासन तसेच राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी एस. टी. कामगार संघटनेच्यावतीने येथील एस.टीच्या विभागीय कार्यशाळेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर धालवलकर, सचिव दिलीप साटम, अनिल नर, विनय राणे, लाड, खवणेकर, विजय गोवेकर, आनंद राणे, मंगेश बापर्डेकर, रवींद्र भिसे, बाळा मालंडकर, प्रवीण कांडरकर, सी. एन. रजपूत यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. तसेच उत्पन्न वाढीसाठी संघटनेकडून सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची दखल घेतली जात नाही. निधी अभावी आर्थिक लाभही कर्मचाऱ्यांना दिले जात नाहीत. मध्यवर्ती कार्यशाळेतील वाढीव कामांच्या श्रमिक तासांची मान्यता मिळणे आवश्यक आहे. कराराच्या तरतुदीनुसार काढण्यात आलेल्या परिपत्रकांची अंमलबजावणी होण्याची गरज आहे. करारातील त्रुटी व विसंगती दूर करणे गरजेचे आहे. उभयपक्षी मान्य असलेली कैशलेस योजना लागू करण्यात यावी. प्रवाशांना दर्जदार सेवा देण्यासाठी असलेले अडथळे दूर करण्यात यावेत. महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी काम करीत असताना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात. नियमबाह्य शिक्षा रद्द करण्यात याव्यात. सेवानिवृत्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात. रिक्त पदे भरण्यात यावित. अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. तसेच समस्या न सुटल्यास पुढील टप्प्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.या आंदोलनापूर्वी विभागीय स्तरावरील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विभाग नियंत्रकांना नोटीस संघटनेच्यावतीने देण्यात आली होती. या नोटीसीतील मुद्यांवर १0 आॅक्टोबर रोजी चर्चा करण्यात आली. विभाग नियंत्रक चेतन हसबनिस यांनी दखल घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावले असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विभाग स्तरावर बुधवारी संघटनेच्यावतीने करण्यात आलेल्या धरणे आंदोलनानंतर आता २८ आॅक्टोबर रोजी राज्यस्तरावर आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय सचिव दिलीप साटम यांनी दिली आहे. (वार्ताहर)दिलीप साटम : २८ आॅक्टोबरला राज्यस्तरावर आंदोलनविभागस्तरावर बुधवारी संघटनेच्यावतीने केलेल्या आंदोलनानंतर आता २८ आॅक्टोबर रोजी राज्यस्तरावर आंदोलन करण्यात येणार आह, अशी माहिती संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय सचिव दिलीप साटम यांनी दिली.