शहरं
Join us  
Trending Stories
1
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
2
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
3
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
4
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
5
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
6
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
7
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
8
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
9
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
10
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
11
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
12
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
13
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
14
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
15
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
16
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
17
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
18
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
19
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
20
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रस्त्यांना घरघर

By admin | Updated: January 23, 2015 23:34 IST

गाव तेथे रस्ता : शासनाच्या नव्या धोरणाची गरज

सुभाष कदम - चिपळूण -गाव तेथे रस्ता हे ब्रीद उराशी बाळगून ग्रामीण भाग मुख्य प्रवाहात यावा, यासाठी शासनाने प्रयत्न सुरु केले. गावागावात रस्ते झाले. परंतु, त्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुरेसा निधी नसल्याने तालुक्यातील सर्वच ग्रामीण रस्ते आता उखडले आहेत. या रस्त्यावरुन वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.  -चिपळूण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या मालकीचे १ हजार किलोमीटरचे ग्रामीण रस्ते आहेत. परंतु, हे रस्ते आता अखेरच्या घटका मोजत आहेत. सर्वच रस्ते आता उखडले आहेत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेक रस्ते हे वळणावळणाचे व घाटाचे आहेत. त्यामुळे ते उखडल्याने खडी वर आली आहे. यावरुन गाडी चालविणे जिकरीचे झाले आहे. ग्रामीण भागात डोंगरदऱ्यातून हे रस्ते जातात. खडी वर आल्याने हे रस्ते आता नावापुरते उरले आहेत. रस्त्यावरील अनेक मोऱ्या तुटल्या आहेत. पुलांवरील रेलिंग गायब झाले आहे. या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी शासनाकडे पुरेसा निधी नाही. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधी निधी आणण्यात कमी पडतात. अनेकवेळा मताची बेरीज बघून त्या भागाची विकासकामे केली जातात. त्यामुळे मुख्य रस्ते दुर्लक्षित राहतात. शिवाय काही लोकप्रतिनिधी आपल्या मर्जीतील किंवा आपल्या फायद्याची कामे करतात. त्याचाही परिणाम या रस्त्यांवर होतो. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे रस्त्याची साधी मलमपट्टी करणेही अवघड झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील रस्त्यांचीही तीच स्थिती आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास रस्ते नावालाही उरणार नाहीत.अविकसित भागावर लक्ष नाही...ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती पाहिली तर आभाळच फाटले त्याला ढिगळ कोण लावणार? अशी परिस्थिती आहे. या रस्त्यांपेक्षा पूर्वीचे असणारे मातीचे रस्तेच बरे असे म्हणण्याची वेळ आली आहे. निधी नसल्याने शासकीय अधिकारी तरी काय करणार? लोकप्रतिनिधी निधी आणण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत आणि आता निधी आला तरी तो पुरणार कोणाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण बुडत्याचा पाय खोलात अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. या स्थितीत बदल कधी होणार. मात्र, तो होणे आवश्यक आहे.- नितीन निकम, उपसरपंच, वैजी ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. अशा स्थितीत शासनाचे सहकार्य नसेल, तर मग ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा तशीच राहणार. भविष्यात परिस्थिती तशीच राहिली तर त्यातून दळणवळणाचे प्रश्न तसेच राहणार आहेत. ते सुटणार काय...