शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

खेडमधील रस्त्यांना राजकीय संघर्षाचे वळण;

By admin | Updated: July 6, 2014 23:55 IST

सरकारचा नाकर्तेपणा व उदासिनता

श्रीकांत चाळके: खेड, तालुक्यातील प्रमुख मार्गांवरील सर्वच रस्ते खड्ड्यात गेले आहेत.़सरकारचा नाकर्तेपणा आणि अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांची डागडुजी करण्याचीे मागणी होत होती. आता पावसाळा सुरू झाल्याने एकाही रस्त्याचे काम होऊ शकणार नसल्याने रस्त्यांना राजकीय संघर्षाचे वळण लागले आहे.याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत संघटक पांडुरंग पटवर्धन यांनी रस्त्यांच्या कामाचा दर्जा ठरवणारी यंत्रणाच किडली असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अशोक आंब्रे यांनी दर्जा ठरवणाऱ्या यंत्रणेत प्रतिवर्षी बदल करण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या रस्त्यांचे भवितव्य स्थानिक स्वराज्य संस्थाचे सदस्य, आमदार यांच्यावरच अवलंबून असते. मात्र, एखाद्या विभागातील रस्त्याचे डांबरीकरण करायचे असेल, तर त्या विभागातील ग्रामस्थांच्या मागणीपेक्षा तेथील विशिष्ट पक्षाची मतदारांची संख्या विचारात घेऊनच त्या कामाला पसंती दिली जाते.खेड तालुक्यातील दोन प्रमुख रस्ते या भागातील गावांना जोडण्यात आले आहेत़ १९६५ मध्ये निर्मिती झालेल्या या रस्त्यांची चाळण झाली आहे़ ४० वर्षात केवळ दोनवेळा डांबरीकरण केलेल्या या रस्त्याच्या डागडुजीकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याची ओरड येथील स्थानिकांकडून होत आहे. तसेच या विभागातील दोन प्रमुख पक्षांच्या घुसखोरीमुळे या मार्गावरील रस्ते आपसातील राजकीय वैमनस्यामुळे तसेच पडून राहीले़ या भागातील खाडीपट्टा, कर्जी, संगलट, शिर्शी या परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या पंधरागाव धामणंद विभागातील रस्ते अनेक वर्षे नादुरूस्त आहेत. गेल्या दोन वर्षांत रस्ता डांबरीकरणाला मुहूर्त मिळाला. आता पाऊस सुरू झाल्याने ही कामे लांबली आहेत. त्यामुळे या रस्त्यांची अवस्था बिकट होणार आहे. येथे पाणी नाही, एस. टी. नाही, वैद्यकीय सुविधा नाहीत़ रस्ता दुरूस्तीसाठीच्या निधीसाठी राजकीय सलगी वाढविण्यात येते. गावपुढाऱ्यावर बरेच काही चालत असल्याने रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आलेली नाही. जी झाली ती काही भागात झाली, असे सांगण्यात येत आहे. रस्त्याच्या दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, रस्ते दर्जाहीन होत असल्याने अशी समस्या वारंवार उद्भवते. यासाठी राज्य सरकारचा निधी त्याच ठिकाणी वापरावा, यासाठी प्रयत्न करायला हवेत. राजकीय संघर्षात खेड तालुक्यातील रस्ते सापडले असून, या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी. त्यात कोणतेही राजकारण आणू नये, अशी मागणी करण्यात येत आहे.खेड तालुक्यातील पंधरागाव भागातील रस्ते खराब झाले. कित्येक वर्षात रस्ता दुरूस्त झाला की नाही, हे पाहायला लोकप्रतिनिधी इकडे फिरकलेही नाहीत. यावेळी मात्र या रस्त्यांची माहिती वरिष्ठांकडे पाठवली असून, त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसेल.